Beed News : एटीएम मशीनच नेले चोरून; अंबाजोगाई शहरातील मध्यरात्रीची घटना

Beed News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने परिसरात कालपासून मोठा पोलीस बंदोबस्त आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जात आहे.
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात चोरट्यांनी एटीएम मशीनच पळवून नेल्याचा धक्कादायक (Beed) प्रकार आज सकाळी समोर आला आहे. शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून या सभेच्या अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर ही घटना घडली आहे. 

Beed News
Jayant Patil News : भाजपचे इंजिन बंद पडल्यामुळे मनसेचे इंजिन सोबत घेतले; जयंत पाटील यांची खोचक टीका

अंबाजोगाई (Ambajogai) शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात खाजगी कंपनीचे एटीएम (ATM) आहे. ४ एप्रिलला मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या एटीएमवर दरोडा घालत चक्क एटीएम मशीनचं लंपास केले आहे. दरम्यान, या 'एटीएम' मध्ये संबंधित बँकेची किती कॅश होती? ते अद्याप स्पष्ट झालेले (Crime News) नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Beed News
Nanded Accident : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी, १५ वऱ्हाडी जखमी

पोलीस बंदोबस्त असताना चोरट्यांचे धाडस 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेच्या निमित्ताने परिसरात कालपासून मोठा पोलीस बंदोबस्त आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असताना चोरट्यानी एटीएम मशीन लांबवल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, अंबाजोगाई शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com