Jayant Patil News : भाजपचे इंजिन बंद पडल्यामुळे मनसेचे इंजिन सोबत घेतले; जयंत पाटील यांची खोचक टीका

Satara News : शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे
Jayant Patil
Jayant PatilSaam tv
Published On

सातारा : शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे की आपल्या १० ते १५ तरी जागा निवडून येतात का? (BJP) भाजपचेच इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं; अशी बोचरी टीका जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सातारा येथे बोलताना केली आहे. 

Jayant Patil
Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांनी शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेतात; अशी टीका सातारा येथे केली होती. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर देताना सांगितले कि, शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. शाहू महाराजांना उमेदवारी घ्या म्हणून त्यांच्या मागे आम्ही लागलो होतो. तर उदयनराजेंना मात्र दिल्लीला ताटकळत थांबावे लागले होते. उदयनराजे यांना मी सल्ला दिला असता उभे राहू नका. आधी शशिकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे दुटप्पीपणा झालेलाच नाही; असं उत्तर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला दिले आहे. 

Jayant Patil
Akola News : बड्या डॉक्टरांविरुद्ध होती तक्रार; पोलिसांनी महिलेला रात्री २ वाजेपर्यत ठाण्यातचं ठेवले बसवून, कारवाईच्या दिल्या धमक्या

प्रश्न विचारू शकणार उमेदवार दिला 

शशिकांत शिंदे हे संसदेत १०० टक्के हजेरी लावतील. मात्र विरोधात उदयनराजे भोसले हे ५ वर्षात फक्त ६ दिवस संसदेत गेले. लोकसभेत आणि राज्यसभेत आपण ज्यांना निवडून देतो ते जर हजर राहत नसतील, तर ते धक्कादायक आहे. पूर्ण वेळ उपलब्ध असणारा नेता, १०० टक्के हजेरी लावून आणि प्रश्न विचारू शकणारा उमेदवार आम्ही दिला असल्याची खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com