Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil: आरोपानंतर आता अमोल कोल्हे यांनी थेट पुरावेच सादर करत आढळराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?
Shirur Lok SabhaSaam Tv
Published On

पुणे|ता. ५ मे २०२४

शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधताना आढळराव पाटील यांनी संसदेत त्यांच्या कंपनीच्या हितासाठी संरक्षण खात्याविषयीच प्रश्न विचारले होते, असा आरोप केला होता. या आरोपानंतर आता अमोल कोल्हे यांनी थेट पुरावेच सादर करत आढळराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आव्हानानंतर लोकसभेत ७ एप्रिल २०१७ आणि १३ फेब्रुवारी २०१९ रोजी मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे अमोल कोल्हे यांनी दाखवली आहेत. आढळरावांनी त्यांच्या कंपनीचं हित जोपासण्यासाठी लोकसभेत हा खटाटोप का केला? असा सवाल उपस्थित करत याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं, शिवाय मी पुरावे दिल्यावर लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडणार, हा दिलेला शब्द आता आढळरावांनी पूर्ण करावा, असे प्रती आव्हानही अमोल कोल्हेंनी दिले आहे.

तसेच हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. असे म्हणत १७ मार्च २०१७, ९ डिसेंबर २०१६ आणि २६ डिसेंबर २०१८ या तारखांना कंपनी हितासाठी मांडलेल्या प्रश्नांची आठवण करून दिली. सोबत कागदपत्रांचा गठ्ठा दाखवत हे सगळे पुरावे टप्याटप्याने जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा देत, कोल्हेनी आढळरावांचं टेन्शन वाढवलं आहे.

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?
Nanded Accident : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी, १५ वऱ्हाडी जखमी

दरम्यान, "मी पंधरा वर्षे लोकसभेत सदस्य म्हणून काम करत असताना लोकसभेची आचार संहिता काटेकोरपणे पाळली आहे. मी माझ्या व्यवसायाशी संबंधित एकही प्रश्न गेल्या पंधरा वर्षात लोकसभेत विचारला नाही, " असा दावा शिरूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांनी केलेल्या आरोपावर केला आहे.

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?
Nanded Accident : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी, १५ वऱ्हाडी जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com