भयंकर! भरधाव ट्रकने १६ जणांना उडवलं, ६ जणांचा जागीच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली.
Madhya Pradesh Ratlam Accident
Madhya Pradesh Ratlam AccidentSaam Tv

Madhya Pradesh Ratlam Accident : मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली. या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू तर १० जण गंभीर जखमी झाले आहे. या भयंकर अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. . (Latest Marathi News)

Madhya Pradesh Ratlam Accident
Petrol Diesel Rate : कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले; 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागलं

अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड झाली. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळावरून ६ जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील सातरुंडा चौकात काही प्रवासी रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहत होते. त्यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचे अचानक टायर फुटले आणि ट्रक थेट गर्दीत घुसला. या भयंकर घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू तर १० जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ६ जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले.

या अपघातावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केलं असून प्रशासनाला जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपघातातील मृतांना प्रत्येक २ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com