Petrol Diesel Rate : कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले; 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागलं

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaamTV

Petrol Diesel Price : आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जारी केले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होत आहेत.

Petrol Diesel Price
Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकणार?, भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली

राजस्थानमध्ये पेट्रोल 0.48 रुपयांनी स्वस्त होऊन 108.62 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 0.43 रुपयांनी कमी होऊन 93.85 रुपयांवर पोहोचले आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोल 0.60 रुपयांनी कमी होऊन 102.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.59 रुपयांनी कमी होऊन 95.96 रुपये झाले आहे. दुसरीकडे, पंजाबमध्ये पेट्रोल 96.89 रुपये आणि डिझेल 0.30 रुपयांनी महागले आहे. याशिवाय झारखंड, हिमाचल आणि महाराष्ट्रातही इंधनाच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price
Pune : पुण्यात चाललंय काय? प्रेमप्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन युवकाला अपहरण करून बेदम मारहाण

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com