Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकणार?, भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली

विधीमंडळाच्या अधिवेशनाला जेमतेम १५ दिवस उरले असतानाही शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची साधी चर्चाही होत नसल्याने इच्छुक धास्तावले आहेत.
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News
Eknath Shinde News, Devendra Fadnavis Newssaam tv

शिवाजी काळे, साम टीव्ही

Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ४० हून अधिक आमदारांनी शिवसेनेतून बंड केलं. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार स्थापन झालं. पण, सरकार स्थापन होऊ जवळपास ५ महिन्यांचा कालावधील लोटला, तरी देखील मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा अजूनही पार पडलेला नाही. त्यामुळे भावी मंत्र्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.  (Maharashtra Politics News)

Eknath Shinde News, Devendra Fadnavis News
Hath Se Hath Jodo : भारत जोडो यात्रेनंतर काय? काँग्रेसचा मोठा प्लान आला समोर

विधीमंडळाच्या अधिवेशनाला जेमतेम १५ दिवस उरले असतानाही शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची साधी चर्चाही होत नसल्याने इच्छुक धास्तावले आहेत. विशेष बाब म्हणजे अधिवेशनाआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी उरकण्याचे संकेत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने दिले होते. (Latest Marathi News)

मंत्रीमंडळाचा विस्तार न होण्याची कारणं?

1. सध्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना आपली खाती इतर मंत्र्यांना द्यावी लागतील. त्यामुळं त्यांचा मंत्रीमंडळ विस्ताराला विरोध

2. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांकडून मंत्री पदाची शपथ घेतल्यास विरोधक टीका करतील

3. राज्यपाल बदलल्यानंतरच होणार शपथविधी

काय आहे भाजपचा प्लान?

मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही तर आमदार फुटणार अशा बातम्या सातत्याने येत आहेत. मात्र, पुढील 1 ते दीड महिन्यात या साऱ्या बातम्या थांबणार आहेत. कारण पुढील 1 ते दीड महिन्यात निवडणूक आयोग शिवसेना कोणाची? याचा फैसला देण्याची शक्यता आहे.

शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणूक आयोगाने दिला तर दोनही गटाच्या आमदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होईल. त्यामुळं आमदारांचा या गटातून त्या गटात जाण्याचा मार्ग बंद होईल. आणि शिंदे फडणवीस सरकार स्थिर होईल.

Eknath Shinde News, Devendra Fadnavis News
Video : छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मंत्रीमंडळ विस्तार होणार का?

शिंदे यांनी आमदारांना गटात घेताना मंत्रीपदाचं आश्वासन दिलं आहे. मात्र, हे आश्वासन ते पूर्ण करू शकले नाही. त्यामुळं आज ना उद्या मंत्रीमंडळ विस्तार होईल आणि आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. अशा भोळ्या आशेवर हे आमदार आहेत. अधून मधून काही आमदार आपली नाराजी बोलवून ही दाखवतात. मात्र, या आमदाराची नाराजी दूर होणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

कारण एकदा शिवसेना कोणाची हा फैसला निवडणूक आयोगाने दिला तर शिंदे फडणवीस सरकार मंत्रीमंडळ विस्ताराचा कोणताही दबाव असणार नाही. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने शिंदे फडणवीस सरकार स्थिर होणार आहे. आणि सरकार दबाव आणणाऱ्या मंत्र्याऐवजी शिंदे आणि फडणवीस यांना त्यांना हव्या त्या आमदारांनी संधी देऊन मंत्रीमंडळ विस्तार करता येणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com