Video : छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराजांवरून राज्यात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve Newssaam tv

Roasaheb Danve News : छत्रपती शिवाजी महाराजांवरून राज्यात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा उल्लेख एकेरी केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

Raosaheb Danve News
Amol Kolhe VIDEO: आता हसावे की रडावे, शिवरायांबद्दल चुकीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंनी प्रसाद लाडांसमोर कोपरापासून हात जोडले

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यासहित साताऱ्यात वातावरण पेटलं आहे. आज, रविवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्था जवळ रावसाहेब दानवे,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप पक्षा विरोधात घोषणबाजी करत रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे. यावेळी पोलिस आणि उदयनराजे समर्थकांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण पाहायलं मिळालं.

Raosaheb Danve News
BJP MLA Prasad Lad: छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात; पुन्हा वादाची ठिणगी, चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर लाडांची दिलगिरी

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी देखील त्यावरून टीका केली. 'भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली.

दानवे यांच्या वक्तव्यावरून मिटकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. 'भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा सुरू केली आहे. या भाजपच्या हरामखोर लोकांना रायगडावरून कडेलोट करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य आमदार मिटकरी यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com