Amol Kolhe VIDEO: आता हसावे की रडावे, शिवरायांबद्दल चुकीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंनी प्रसाद लाडांसमोर कोपरापासून हात जोडले

Amol Kolhe
Amol Kolhe Saam TV

मुंबई : राज्यपाल, मंगलप्रसाद लोढा यांनी शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली असताना, आता त्यात प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झालाय, असं वक्तव्य भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. त्यामुळे सध्या ते विरोधकांच्या निशाण्यावर आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी तर त्यांच्या या वक्तव्यानंतर कोपऱ्यापासून हात जोडले आहे. काय ते अगाध ज्ञान, असं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी प्रसाद लाड यांच्यावर निशाना साधत ट्वीट केलं आहे.

Amol Kolhe
BJP MLA Prasad Lad: छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात; पुन्हा वादाची ठिणगी, चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर लाडांची दिलगिरी

काय म्हणाले अमोल कोल्हे?

वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर! अध्यक्ष महोदय,माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.

अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा? असं म्हणतं छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणाऱ्यांच्या अज्ञानावर खासदार अमोल कोल्हेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

छत्रपती आणि महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान होत असताना सर्वच स्थरावरुन निषेध व्यक्त होत असताना या ट्वीटमध्ये कोल्हे म्हणतात, आता हसावे की रडावे या पलीकडील उद्विग्नता आहे. निषेध किंवा धिक्कार करणे पालथ्या घड्यावर पाणी आहे. पुन्हा इतिहास रूजवावा लागणार, जागवावा लागणार! असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.

Amol Kolhe
Nagpur News: मोदींच्या हस्ते उद्घाटनाआधीच शिंदे-फडणवीस अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये; समृद्धी महामार्गावरुन करणार एकत्र प्रवास

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. कोकण मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान या वक्तव्यावरुन टीका सुरु झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कालच मी माझं वक्तव्य सुधारलं होतं असं देखील ते म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com