Crime News
Crime Newssaam tv

Pune : पुण्यात चाललंय काय? प्रेमप्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन युवकाला अपहरण करून बेदम मारहाण

प्रेम प्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन तरुणाचे ओळखीच्या तरुणांनी अपहर केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime News : पुण्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन तरुणाचे ओळखीच्या तरुणांनी अपहर केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणांनी अपहरण केलेल्या तरुणाला जबर मारहाण देखील करण्यात आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (ता.1) मुंढवा परिसरात घडली. (Latest Marat News)

Crime News
Pune Crime News: न्यूड फोटो ई-मेल करत व्हायरल करण्याची धमकी; पुण्यातल्या प्रसिद्ध बिल्डरकडे ६० बिटकॉइनची मागणी

तन्मय दिपक पाचरणे (वय 20), वेदांत महादेव गपाट (वय 19) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी करण शंकर माळी (वय 19) याने चंदननगर पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. करणने संगणकविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला असून सध्या तो एका हॉटेलमध्ये अर्धवेळ काम करत आहे. वाघोलीतील एका कॉलेजमध्ये करण, तन्मय व तरुणी एकत्र शिक्षण घेत असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख होती.

नेमकं काय घडलं ?

शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास करण हा त्याच्या मित्रांना भेटून दुचाकीवरुन कामाला निघाला होता. त्यावेळी संशयित आरोपी तन्मयने करणच्या मोबाइलवर संपर्क साधला. करणला दुचाकी बंद पडल्याची बतावणी करुन मुंढवा परिसरात बोलावण्यात आले. तन्मयने करणला दुचाकीवरुन घरी सोडण्यास सांगितले. काही अंतर गेल्यानंतर तन्मयचा मित्र वेदांत व त्याचे मित्र कारमध्ये बसले होते. दुचाकीवरुन उतरुन तन्मयने करणला कारमध्ये बसण्यास सांगितले.

दरम्यान, करणला संशय आल्याने तातडीने त्याच्या मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्याचवेळी तन्मयने करणचा मोबाइल त्याच्या हातातून काढून घेतला. त्यानंतर तन्मय, वेदांत व त्यांच्या साथीदारांनी करणला कारमध्येच बेदम मारहाण केली.

कॉलेजमधील मैत्रिणीशी तुझे प्रेमप्रकरण सुरू असून तिच्याशी संबंध ठेवू नको, अशी धमकी करणला दिली. मुंढवा रस्त्यावरील एका खोलीत त्याला डांबून ठेवत त्याला दारु पाजली. तसेच दारुची बाटली त्याच्या डोक्‍यात फोडली.

याचबरोबर करणला बांबू व सळईने जबर माहराण केली. या जबर मारहाणीत करण बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी पहाटे करण शुद्धीवर आला. त्यानंतर तन्मय व त्याच्या साथीदारांनी त्यास खराडी परिसरात सोडून दिले. करणने या घटनेची माहिती त्याच्या भावाला दिली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी तक्रार पोलिसांत दाखल केली.

Crime News
Video : मुंबईत भररस्त्यात दोन गटात तुफान राडा; धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला

दरम्यान, करणवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ दोन आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com