Pune Crime News: न्यूड फोटो ई-मेल करत व्हायरल करण्याची धमकी; पुण्यातल्या प्रसिद्ध बिल्डरकडे ६० बिटकॉइनची मागणी

३० तारखेला आलेल्या ई-मेलमध्ये तात्काळ ५ बिटकॉइन पाठवावेत असे लिहिले होते.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

Pune Crime News: पुण्यातील एका मोठ्या बिल्डरवर सायबर हल्ला झाला आहे. बांधकाम व्यवसायिकाला त्याचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. एका ई-मेलद्वारे व्यवसायिकाला धमकी देत त्याच्याकडे ६० बिटकॉइनची (८,३०,४०,००० रुपये) मागणी करण्यात आली. या घटनेबाबत संबंधित बिल्डरने पोलिसांत धाव घेतली असून पोलीस ई-मेल केलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर कंपनीत ब्रँड हेड म्हणून काम करणाऱ्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २९ नोव्हेंबर रोजी कंपनीचे काम करत असताना एका मेल आयडीवरून कंपनीच्या मेल आयडीवर मेल आला. त्यात कंपनीच्या चेअरमनचे न्यूड फोटो व्हायरल केले जातील अशी धमकी होती. यात इतर कर्मचाऱ्यांची देखील बदनामी केली जाईल. तसेच ही बदनामी रोखण्यासाठी ८ कोटी ३० लाख ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

Pune Crime News
Cyber Crime: कुरीअरसाठी गुगलवर नंबर शोधणे पडले महागात; ९८ हजार रुपयांची फसवणूक

पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, महिलेने (Woman) २९ तारखेलाच तक्रार दाखल केली नाही. त्यांनी आधी कंपनीच्या चेअरमनला याविषयी सांगितले. तेव्हा कोणीतरी फिरकी घेत असावे असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र दुसऱ्या दिवशी ३० नोव्हेंबरला पुन्हा एकदा दुपारी ई-मेल आला. तेसच रात्री ८ वाजता आलेल्या ई-मेलमध्ये त्या व्यक्तीने चेअरमनचे न्यूड फोटोही पाठवले आणि जास्त वेळ वाया घालवू नये असे लिहिले. या नंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली.

Pune Crime News
Cyber Crime: मेडीकल कोर्सला प्रवेश देण्याची बतावणी; 15 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक

३० तारखेला आलेल्या ई-मेलमध्ये तात्काळ ५ बिटकॉइन पाठवावेत असे लिहिले होते. तसेच ६० बिटकॉइन १ डिसेंबर रोजी रात्री ९ पर्यंत पाठवाण्यास सांगितले होते. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचे एक पथक सदर व्यक्तीचा तपास घेत आहेत. पोलिसांनी (Police)यासाठी विशेष सायबर तज्ञांची देखील मदत घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com