Ayodhya Ram Mandir Prasad Saam tv
देश विदेश

Ayodhya Ram Mandir Prasad : घरबसल्या फ्रीमध्ये भक्तांना मिळणार अयोध्येतून श्रीराम मंदिरातील प्रसाद, ऑनलाइन बुकिंग कशी कराल?

कोमल दामुद्रे

Free Prasad Online Booking :

२२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात रामाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु, सर्वसामान्य नागरिकांना या दिवशी अयोध्येत न येण्याचे आव्हान केले आहे.

अशातच अयोध्येत (Ayodhya) पार पडणाऱ्या प्रतिष्ठापनेचा प्रसाद भक्तांना मिळू शकतो. एका खासगी कंपनीने वेबसाइटद्वारे देशभरात प्रसादाची होम डिलिव्हरी करण्याचे ठरवले आहे. खार्डीऑर्गेनिक नावाच्या वेबसाइटने (Website) दावा केला आहे की, राम मंदिरातील प्रसाद प्रत्येक भक्ताच्या घरापर्यंत पोहोचेल असा दावा केला. जर तुम्हालाही हा प्रसाद घरबसल्या हवा असेल तर त्याचा लाभ कसा घेता येईल हे पाहूया.

1. ५१ रुपये डिलिव्हरी चार्जेस

प्रसाद वितरणासाठी कंपनीने शिप रॉकेटसारख्या डिलिव्हरी पार्टनरशी टाय अप केले आहे. या प्रसादाची किमत घरोघरी पोहोचवण्याची अंदाजे किंमत त्याने ४० ते ६० रुपये दिली आहे. यामध्ये प्रसादाची किमत (Price) थरथरनी देईल तर भक्तांना फक्त डिलिव्हरी चार्जेस मोजावे लागणार आहे. तसेच राम मंदिरांशी संबंधित इतर अनेक गोष्टी जसे की, टी-शर्ट, नाणे, ध्वज इत्यादी गोष्टी तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर मिळेल. तर यातील काही उत्पन्न दान करण्यात येईल.

2. प्रसादासाठी ऑनलाइन बुकिंग कशी कराल?

यासाठी भक्तांना khadiorganic.com वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर होम पेजवर फ्री प्रसाद या पर्यायावर क्लिक करा.

पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला मोबाइल नंबर टाकावा लागेल. तुम्हाला घरपोच डिलिव्हरी हवी असेल तर डिलिव्हरी पर्यायावर क्लिक करा.

जर तुम्हाला वितरण केंद्रातून प्रसाद घ्यायचा असेल तर तुमच्या वितरण केंद्रातून पिकअपवर क्लिक करा.

यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरून पैसे भरा.

कंपनीने म्हटले की, सध्या ऑर्डर ट्रॅक करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. पण २२ जानेवारीनंतर युजर्सना त्यांच्या ऑर्डरचे तपशील कळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT