Ayodhya Ram Mandir Saamtv
देश विदेश

Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी ३ हजार अर्ज, २०० जणांची निवड; ६ महिन्यांचे ट्रेनिंग होणार

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) मुख्यालय कारसेवक पुरम येथे या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.

Gangappa Pujari

Ram Mandir Ayodhya News:

अयोध्या नगरीमधील प्रभू श्री राम मंदिराचे काम पुर्ण झाले आहे. २२ जानेवारी २०२४ ला नववर्षाच्या सुरूवातीलाच मोठ्या जल्लोषात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याआधी अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजारी पदासाठी आत्तापर्यंत तब्बल ३ हजार अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामधील २०० उमेदरावांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राम मंदिरामध्ये (Ram Mandir) पुजारी पदासाठी आत्तापर्यंत ३००० अर्ज आल्याची माहिती अयोध्येच्या राम मंदिर विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिली आहे. त्यापैकी २०० जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले असून सध्या त्यांच्या मुलाखती असल्याचेही ते म्हणाले.

अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) मुख्यालय कारसेवक पुरम येथे या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यांची मुलाखत अयोध्येचे दोन महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास तसेच वृंदावनचे जयकांत मिश्रा यांच्या तीन सदस्यीय पॅनेलद्वारे घेतली जात असल्याची माहितीही गोविंद देव गिरी यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलाखतीला उपस्थित झालेल्या 200 उमेदवारांपैकी 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल ज्यांना 6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर राम मंदिराचे पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. तसेच, त्यांना वेगवेगळ्या पदांवर तैनात केले जाईल. ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची ट्रस्टने निवड केलेली नाही, तेही ६ महिन्यांच्या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. प्रशिक्षणानंतर त्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिरूर हवेली विधानसभेत शरद पवारांची आघाडी

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT