Ayodhya Deepotsav: २२ लाख २३ हजार दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी; विश्वविक्रमी दिपोत्सवाचा डोळे दिपवणारा VIDEO

Ayodhya Nagari Deepotsav Video: दिवाळीचं खास आकर्षण असलेला प्रभू श्री राम नगरीतील दिपोत्सवाने यंदा जागतिक रेकॉर्ड केला आहे.
Ayodhya Nagari Deepotsav Video:
Ayodhya Nagari Deepotsav Video: Saamtv
Published On

Ayodhya Deepotsav 2023:

देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीचं खास आकर्षण असलेला प्रभू श्री राम नगरीतील दिपोत्सवाने यंदा जागतिक रेकॉर्ड केला आहे. दिवाळीनिमित्त अयोध्येत खास सजावट करण्यात आली आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला शरयू नदीच्या तिरावर लाखो दिव्यांनी रोषणाई करण्यात आली होती. रामनगरीत 22 लाख 23 हजार दिवे प्रज्वलित होताच अनोखा इतिहास रचला गेला. दिवे लावण्याच्या या विक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. 

'अयोध्या दीपोत्सव 2023' मध्ये दिवे लावण्याचा नवा विश्वविक्रम झाला आहे. यापूर्वी 18 लाख 81 हजार दिवे लावण्याचा विक्रम होता, तो मोडून यंदा दीपोत्सव कार्यक्रमात 22 लाख 23 हजार दिवे लावण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे. या विक्रमाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टीमने प्रमाणपत्र दिले आहे. शेकडो स्वयंसेवकांनीपरिश्रम घेऊन हे २४ लाख दिवे लावले आहेत.

अयोध्या दीपोत्सव कार्यक्रमात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्यासह ५० हून अधिक देशांचे राजदूत सहभागी झाले होते.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीची आरती केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कार्यक्रमाच्या शेवटी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या दिव्यांच्या भव्य उत्सवात सहभागी होण्यासाठी इतर राज्यातून आणि शहरातील लोक आले होते. तसेच जगातील १०० हून अधिक देशांमध्ये या दीपोत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. रात्रीच्या ‘लाइट ॲण्ड साऊंड’ कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या दिपोत्सवाचा डोळे दिपवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Ayodhya Nagari Deepotsav Video:
Eknath Shinde: काही फुसके बार आले होते, जे न वाजताच निघून गेले...; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com