Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv

Jalgaon Accident: दिवाळीच्या आदल्या दिवशीच परिवारावर शोककळा; कठड्याला धडक देत कार पलटी, पतीचा मृत्यू, पत्नी मुलगी गंभीर

Amalner News : जानवे गावाजवळ असलेल्या पुलाच्या कठड्याला भरधाव चारचाकी धडकल्याने कार पलटी
Published on

अमळनेर (जळगाव) : कारने धुळ्याकडे जात असताना परिवाराचा अपघात झाला. महामार्गाने भरधाव कारने (Amalner) पुलाच्या कठड्याला धडक दिल्याने कार अनियंत्रित होऊन पलटी झाली. यात गाडी चालवत असलेल्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली पत्नी व मुलगी गंभीर जखमी आहेत. हा अपघात शनिवारी जानवे गावाजवळ घडली. (Live Marathi News)

Jalgaon Accident
Pune Crime: दिवाळीच्या खरेदीसाठी गेल्या पण बोनस झाला चोरी; पुण्यातील मार्केटमध्ये चोरट्यांचा प्रताप

अमळनेर- धुळे महामार्गावर झालेल्या अपघातात भगवान दलपत सपकाळे (वय ६३, रा. गिरणा पंपिंगजवळ, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भगवान सपकाळे हे पत्नी विजया कोळी (वय ५५) आणि मुलगी कुंतला कोळी (वय २४) यांना घेऊन कारने अमळनेरहून धुळ्याकडे जात होते. या दरम्यान जानवे गावाजवळ असलेल्या पुलाच्या कठड्याला भरधाव चारचाकी धडकल्याने कार पलटी होऊन भगवान सपकाळे जागीच मृत्यू झाला. विजया आणि कुंतला कोळी दोन्ही जखमी झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Accident
Solapur News : 'फोन पेवर'च कराचे पैसे स्वीकारणे पडले महागात; गुंजेगावच्या महिला सरपंचाचे पद गेले

नागरिक धावले मदतीला 

अपघात (Accident) होताच परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेचे वृत्त कळताच सहायक निरीक्षक हरिदास बोचरे व पोलिस कर्मचारी कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस पाटील विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून मृत भगवान सपकाळे यांच्याविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस व दोघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरले म्हणून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com