देश विदेश

Myanmar: नागरिकांनो! म्यानमारचा प्रवास करणं टाळा; हिंसाचाराच्या दरम्यान भारत सरकारकडून मार्गदर्शन सुचना जाहीर

Myanmar: लोकांनी म्यानमारला जाणे टाळावे, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

Bharat Jadhav

Ministry of External Affairs Issued Guidelines For Myanmar:

मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) आणि म्यानमारमधील लष्करामधील चकमक झालीय. या घटनेवरून भारत सरकारने भारतीय लोकांसाठी एक मार्गदर्शन सुचना जाहीर केलीय. लोकांनी म्यानमारला जाणे टाळावे, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. (Latest News)

म्यानमारमधील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांना म्यानमारमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय. याशिवाय जे लोक आधीच म्यानमारमध्ये राहत आहेत. त्यांनी हिंसाचार प्रभावित भागात जाऊ नये. रस्त्याने आंतरराज्य प्रवास देखील टाळावा, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलंय. मंत्रालयाचे प्रवक्ते अरंदीम बागची यांनी याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिलीय. म्यानमारमध्ये राहणाऱ्या लोकांना भारतीय दूतावासात फॉर्म भरून नोंदणी करण्याचे आवाहनदेखील त्यांनी एक्सवर पोस्ट करत केलंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे वाद

पीडीएफने भारतीय सीमेजवळील म्यानमारच्या चीन राज्यातील खावमवी आणि रिखावदार या दोन लष्करी स्थानांवर हल्ला केला होता. त्यानंतर पीडीएफ आणि म्यानमारच्या सैन्यामुळे चकमक झाली. पीडीएफने हल्ला केल्यानंतर म्यानमारच्या लष्कराने प्रत्युत्तर देत खावमावी आणि रिहखावदार गावांवर हवाई हल्ले केले. यामध्ये एका ५१ वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला.

याशिवाय या हल्ल्यात पीडीएफमधील सुमारे ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. मिझोरामचे ६ जिल्हे चंफई, सियाहा, लांगतलाई, सेरछिप, हनाथियाल आणि सैतुअल म्यानमारच्या चीन राज्याच्या सीमा रेषेला लागून आहेत.. म्यानमारमध्ये २०२१ मध्ये झालेल्या सत्तापालटानंतर सुमारे ३० हजार निर्वासित चीनी येथे राहतात. याआधी एप्रिलमध्ये म्यानमार लष्कराने हवाई हल्ले केले होते. यात सुमारे १०० लोक मारले गेले होते. पाजिगी शहरात हा हल्ला झाला. पीडीएफ म्यानमार देशात लष्कराच्या विरोधात मोहीम चालवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Banana Leaf: श्रावणात केळीच्या पानात का जेवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

Konkan Ro Ro Seva : गणेशोत्सवासाठी खुशखबर मुंबई ते सिंधुदुर्ग सागरी रो-रो सेवा लवकरच सुरु | VIDEO

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील निकाल वाचनाला सुरुवात

Monsoon Eye Care : डोळ्यांची जळजळ अन् लाल झालेत का? पावसाळ्यात अशी घ्या काळजी

MPSC FDA Recruitment: अन्न व औषध प्रशासनात नोकरीची संधी; पगार १३२३०० रुपये; MPSC द्वारे जाहीर केली भरती

SCROLL FOR NEXT