National Herald : राहुल- सोनिया गांधी यांना EDचा दणका; नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियाची ७५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

National Herald Case : काँग्रेसशी संबंधित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) आणि यंग इंडियाची मालमत्ता जप्त करण्यात आलीय.
 National Herald Case
National Herald Case Yandex
Published On

ED Action On National Herald Case:

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केलीय. ईडीने 7७५२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलीय. काँग्रेसशी संबंधित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) आणि यंग इंडियाची मालमत्ता जप्त करण्यात आलीय.केंद्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाचा एक भाग म्हणून करण्यात आलीय.(Latest News)

ज्यामध्ये दिल्ली, मुंबई आणि लखनौ सारख्या अनेक शहरांमध्ये असलेल्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत. मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान, देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या एजेएल आणि यंग इंडियाच्या स्थावर मालमत्ता बेकायदेशीरपणे विकत घेतल्याचे आढळून आल्याचं अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या निवेदनात म्हटलंय.

ईडीने पीएमएलए, २००२ अंतर्गत चौकशी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ७५१.९ कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या तात्पुरत्या जप्त करण्याचे आदेश जारी केलाय," असं ईडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. दरम्यान ईडीच्या या कारवाईवर काँग्रेसकडून टीका केली जातेय. ईडीने एजेएल मालमत्ता जप्त केल्याची कारवाई केली गेली. ही कारवाई राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांत पराभव होणार असल्यानं त्यावरून नागरिकांचं लक्ष विचलित होण्यासाठी केलीय, अशी टीका काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंधवी यांनी केलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्र सरकार राजकीय सूडबुद्धीतून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोप काँग्रेसने केलाय. मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा कोणताही पुरावा नसल्याचे काँग्रेसने या प्रकरणी म्हटलंय.

 National Herald Case
Political News: ED च्या तावडीतून सुटका हवी, तर १५ कोटी द्या, NCP आमदारांच्या पत्नीला फोन आल्याने खळबळ; काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com