Patanjali News: ...अन्यथा तुम्हाला १ कोटींचा दंड ठोठावणार', सुप्रीम कोर्टाचा पतंजलीला 'सर्वोच्च' दणका!

Supreme Court: न्यायालयाने पतंजलीला कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा खोटे दावे करू नयेत असे सांगितले आहे.
Supreme Court Slams Patanjali Ayurveda:
Supreme Court Slams Patanjali Ayurveda: Saamtv
Published On

Supreme Court Slams Patanjali Ayurveda:

पतंजली आयुर्वेदाच्या आधुनिक औषधे आणि लसीकरणाविरोधातील जाहिरातींवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने पतंजलीला कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा खोटे दावे करू नयेत असे सांगितले असून जाहिराती न हटवल्यास मोठा दंड ठोठावला जाईल, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

कोविड -19 च्या अ‍ॅलोपॅथिक उपचारांबद्दल योगगुरू आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर अनेक राज्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या फौजदारी गुन्ह्यांमधून संरक्षण मिळावे अशी याचिका रामदेव बाबांनी दाखल केली होती. 9 ऑक्टोबर रोजी, सर्वोच्च न्यायालयात बाबा रामदेव यांच्या या रिट याचिकेवर सुनावणी केली.

न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने (Supreme Court) पतंजलीला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरू राहिल्यास 1 कोटींचा दंड आकारला जाईल आणि हा दंड प्रति-उत्पादन आधारावर लागू होईल...असा कडक इशारा दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Supreme Court Slams Patanjali Ayurveda:
Buldhana Loksabha: राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना निरोप... 'मनसे'कडून बुलढाणा लोकसभा लढवण्याची घोषणा; आढावा बैठकीत मोठा निर्णय!

कोर्टाने पतंजलीला भविष्यात अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करु नये, तसंच प्रसारमाध्यमांसमोर आकस्मिक विधानं करु नयेत असा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने केंद्, आयएमए आणि बिहार, छत्तीसगड सरकारांना नोटिस जारी करून त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. (Latest Marathi News)

Supreme Court Slams Patanjali Ayurveda:
Vijay Wadettiwar: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय करत आहेत? दुष्काळाच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांचा सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com