Buldhana Loksabha: राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना निरोप... 'मनसे'कडून बुलढाणा लोकसभा लढवण्याची घोषणा; आढावा बैठकीत मोठा निर्णय!

MNS Buldhana Loksabha: महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा लोकसभेची जागा लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray saam tv
Published On

संजय जाधव, प्रतिनिधी

Buldhana Political News:

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याबाबत महत्वाची अपडेट समोर आली असून मनसे बुलढाणा लोकसभेची जागा लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शेगाव येथील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) बुलढाणा लोकसभा (Buldhana Loksabha) निवडणूक लढणार असल्याची घोषणा आज शेगाव येथील पक्षाच्या आढावा बैठकीत अधिकृत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार डॉ. जयप्रकाश बावस्कर यांनी बुलढाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली.

या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा निरोप डॉक्टर बावस्कर यांनी पदाधिकाऱ्यांना पोहोचविला त्यानंतर या आढावा बैठकीत विस्तृत चर्चा झाल्यानंतर लोकसभेची बुलढाण्याची जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raj Thackeray
Akola News: अकोल्यात कॉंग्रेसला धक्का! जिल्हाउपाध्यक्ष संजय बोडखे यांचा तडकाफडकी राजीनामा

येत्या महिनाभरात उमेदवार निश्चिती करण्याची प्रक्रिया पुर्ण होणार आहे. या आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते जवळपास साडेचार तास ही आढावा बैठक शेगाव येथे सुरू होती. बैठकीनंतर बुलढाणा लोकसभा लढवण्यासाठी मनसेचे बुलढाणा जिल्हाप्रमुख मदन राजे गायकवाड हे उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. (Latest Marathi News)

Raj Thackeray
Pune News: पुण्यात भरणार जागतिक दर्जाचे बागायती फलोत्पादन प्रदर्शन; परदेशी व्यावसायिक, शेतकऱ्यांचा सहभाग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com