Myanmar News : धक्कादायक! म्यानमार सैनिकांच्या गोळीबारात बौद्ध भिक्षूंसह २९ जणांचा मृत्यू

म्यानमारच्या सैनिकांनी एका मठात घुसून बौद्ध भिक्षूंसह २९ जणांची गौळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे.
Myanmar News
Myanmar News Saam tv

नवी दिल्ली : म्यानमारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्यानमारच्या दक्षिणी शान राज्यात शनिवारी म्यानमारच्या सैनिकांनी एका मठात घुसून बौद्ध भिक्षूंसह २९ जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एएनआय वृत्त संस्थेने हे वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मठाच्या प्रवेशद्वारावर मृतदेह आढळून आले होते. या मृतदेहांचे फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत. या मृतदेहात तीन बौद्ध भिक्षूंचा सामावेश आहे. मठाच्या समोरच गोळीबार (Firing) झाल्याची माहिती समोर आली आहे. म्यानमारच्या स्थानिक वृत्ताच्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीलाच जुन्टा सैनिकांनी सांगैगमधील १७ ग्रामीण भागातील लोकांची हत्या केली होती.

Myanmar News
Viral Video : तरुणांचा 'कार'नामा! धावत्या कारमधून फेकल्या 500-2000 नोटा; नेमकं घडलं तरी काय?

२९ जणांचा मृत्यू

सरकार विरोधी असलेल्या कारेन्नी राष्ट्रीय संरक्षण दल आणि म्यानमारच्या स्थानिक वृत्त संस्थाने या मृतदेहांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दिसून येत आहे की, मृतदेहांच्या डोके आणि अन्य शरीराच्या भागावर गोळा झाडल्याच्या जखमा दिसून येत आहे. KNDFच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार, आतापर्यंत २२ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तर उरलेले सात मृतदेह घटनास्थळी असण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्यानमारच्या सैनिकांनी गावातील अनेक घरांना आग लावली आहे. म्यानमारच्या शान प्रांतात सत्ता बदल झाल्यानंतर म्यानमार सैनिकांच्या जाचाला स्थानिकांना सामोरे जावे लागत आहे.

Myanmar News
Imran Khan News : पोलिसांना माझं अपहरण करून ठार मारायचंय; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा

आतापर्यंतच्या हिंसेत २९०० जणांचा झालाय मृत्यू

दरम्यान, म्यानमारच्या २०२१ मध्ये सत्तेत बदल झाला आहे. म्यानमारमध्ये सैनिकांनी थेट सत्तेवर कब्जा केला. यामुळे म्यानमारमध्ये (Myanmar) हिंसा वाढली. या हिंसेत आतापर्यंत २९०० जणांना जीवाला मुकावे लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com