Attack On NIA Team Saam Tv
देश विदेश

NIA Attacked In Bengal: पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला, २ अधिकारी जखमी

Rohini Gudaghe

Attack On West Bengal NIA Team

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एनआयएच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. छापा टाकण्यासाठी गेलेल्या टीमवर (NIA Team) अज्ञातांनी हल्ला केला आहे. या हल्यात काही अधिकारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.  (Latest Marathi News)

पश्चिम बंगालमधील मिदनापूर (Midnapore) जिल्ह्यातील भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या गेलेल्या एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) टीमवर हल्ला (NIA Attacked In Bengal) झाल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएची टीम सीएपीएफ (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) सोबत या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यासाठी गेली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यादरम्यान काही अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी एनआयए पथकावर दगडफेक करून कारच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात दोन अधिकारी जखमी झाले आहेत. परंतु कोणीही गंभीर जखमी झाले (West Bengal NIA Team) नाही. 3 महिन्यांपूर्वी देखील संदेशखळी येथे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर हल्ला झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये तृणमूल काँग्रेस नेत्याच्या निवासस्थानी बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी NIA टीम आली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी एनआयएच्या वाहनावर विटा (Attack On NIA Team) आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. ही घटना आज (६ एप्रिल) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

हा बॉम्बस्फोट हल्ला 3 डिसेंबर 2022 रोजी झाला होता. यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गेल्या महिन्यात एनआयएने टीएमसीच्या आठ नेत्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले (Blast Case) होते. यापूर्वीही या नेत्यांना हजर राहण्यास सांगितले होते, मात्र ते हजर झाले नाहीत. भाजपच्या इशाऱ्यावर एनआयए त्यांच्याविरोधात काम करत असल्याचा आरोप टीएमसी नेत्यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT