Sadanand Date: पंधराव्या वर्षी वडिलांचं निधन, आईने घरकाम करून शिकवलं; शिपाई ते NIA प्रमुख, सदानंद दातेंचा संघर्षमय प्रवास

26/11 Hero Sadanand Date : 26/11 च्या हल्ल्यातील कारवाईत आघाडीवर असणारे IPS अधिकारी सदानंद वसंत दाते यांची NIA च्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्यावर केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
26/11 Hero Sadanand Date
26/11 Hero Sadanand DateYandex

Sadanand Date Selected To Lead NIA

आयपीएस अधिकारी सदानंद दाते ((Sadanand Date) यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालक पदावर नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारने दाते आणि इतर दोन IPS अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सदानंद वसंत दाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज आपण सदानंद दाते यांचा प्रवास करा राहिला ते जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते 26/11 च्या हल्ल्याला पोलिसांच्या प्रतिक्रियेमध्ये आघाडीवर (Sadanand Date Selected To Lead NIA) होते. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दाते यांना त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आलं होतं. आता सरकारने त्यांची NIA च्या महासंचालकपदी नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता सदानंद दाते दहशतवादविरोधी एजन्सी एनआयएचे नवे महासंचालक असणार आहेत. राज्य एटीएसचे सध्याचे महासंचालक दाते यांनी या घोषणेसंदर्भात सांगितले की, सदानंद दाते 'एनआयएचा एक भाग असणे हा सन्मान आहे'. (26/11 Hero Sadanand Date) नोव्हेंबर २०१२ मध्ये कसाबला आर्थर रोड तुरुंगातून पुण्यातील येरवडा तुरुंगात हलवण्याच्या अत्यंत गुप्त ऑपरेशनची आखणी आणि देखरेख दातेंनी केली होती. भंडारा एसपी म्हणून काम करत दाते यांनी नक्षल चळवळीतील भरकटलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणून इतिहास घडवला. शिवाजी तुमरेड्डी या नक्षलवाद्यानेही राज्यातील पहिले आत्मसमर्पण ( Sadanand Date struggle story) केले होते.

त्यांचे मोठे भाऊ गणेश दाते त्यांच्या निवडीवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. लहानपणापासूनच दातेंमध्ये नेतृत्वगुण होते. आजचं यश मिळविण्यासाठी दातेंनी अनेक अडचणींवर मात केली (Maharashtra ATS Chief Sadanand Date) आहे. त्यांनी त्यांच्या भावाच्या यशाचे श्रेय पुण्यातील त्यांच्या शिक्षकांना दिले. ज्यांनी त्यांच्या अभ्यासाला आणि इतर कामांना पाठिंबा दिला. त्याच्या एका प्राध्यापकाने सदानंदला यूपीएससी परीक्षेला बसण्याची कल्पना दिल्याचं त्यांनी सांगितलं.

26/11 Hero Sadanand Date
Hyderabad Video: बंदोबस्तावर तैनात असलेल्या IPS अधिकाऱ्याला मंत्र्यांच्या ताफ्याने चिरडलं, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

दाते १५ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांची आई उदरनिर्वाहासाठी लोकांकडे घरकाम काम करत होती. शिक्षण सुरू ठेवत त्यांनी 1977 ते 1988 या काळात वृत्तपत्र वाटण्याचे काम (Sadanand Date News) केले. त्यांच्या भावाने दातेंना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन दिले. रिसेप्शनिस्ट इननर्सिंग होम आणि फर्निचर रिटेल स्टोअरमध्ये शिपाई अशा विविध नोकऱ्या करून दाते त्यांच्या कुटूंबाचा आधार बनले.

नोकरी करत असताना दाते यांनी वाणिज्य शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ते कॉस्ट अकाउंटंट झाले. नंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी केली. आतापर्यंतच्या 34 वर्षांच्या सेवेत त्यांनी सीबीआयमध्ये विशेष युनिटमध्ये काम केले आहे. सीबीआयमध्ये काम करत असताना त्यांनी मिनेसोटा विद्यापीठात हम्फ्रे फेलोशिप (2005-2006) मिळविली होती.

26/11 Hero Sadanand Date
Success Story: तृप्ती भट्ट्ची यशोगाथा! १६ सरकारी नोकऱ्या नाकारून बनली IPS ऑफिसर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com