पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी येथे मतदान होणार.
निवडणुकांसाठी सुमारे ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी तैनात.
मतमोजणीसाठी ४० हजार अधिकारी नियुक्त.
भारतीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केलं. या वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभांचा कार्यकाळ मे आणि जूनमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. निवडणूक आयोग रविवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या ५ राज्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम कसा पार पडणार याची माहिती निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, गेल्या काही दिवसांत, आयोगाने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदारांसाठी आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व निवडणूकग्रस्त राज्यांच्या भेटी घेतल्या. या भेटींदरम्यान, आयोगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची भेट घेतली. त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.
आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस अधीक्षक (एसपी), पोलिस महानिरीक्षक (आयजी), उपमहानिरीक्षक (डीआयजी) आणि सर्व अंमलबजावणी संस्थांच्या नोडल अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. आयोगाने संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्यासोबत बैठका घेतल्या.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, निवडणुका निष्पक्षपणे पार पडतील. बीएलओना ओळखपत्र दिले जाणार आहे. सर्व माहिती ECI-NET वर उपलब्ध असणार आहे. मतदानानंतर लगेचच मतदारांची संख्या जाहीर केली जाईल. मतमोजणीसाठी ४० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत १७.४ कोटी लोक मतदान करतील. पाच राज्यांमध्ये २.१९ लाख मतदान केंद्रे असणार आहेत.
१.५ दशलक्ष मतदान कर्मचारी
८.५ लाख सुरक्षा अधिकारी
४९,००० सूक्ष्म निरीक्षक (मतदान)
१,४४४ निरीक्षक
४०,००० मतमोजणी अधिकारी
२१,००० क्षेत्रीय अधिकारी
१५,००० निरीक्षक (मतमोजणी)
बंगाल-२९४
तामिळनाडू-२३४
आसाम-१२६
केरळ-१४०
पुदुच्चेरी-३०
आसाम - २५ दशलक्ष
केरळ - २७ दशलक्ष
पुद्दुचेरी - ९४.४ दशलक्ष
तामिळनाडू - ५६.७ दशलक्ष
पश्चिम बंगाल - ६४.४ दशलक्ष
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.