Election 2026: धुरळा उडाला! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Assembly Elections 2026 Announced: आसामसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. या ५ राज्यात मतदान कधी होणार आणि निकाल कधी लागणार हे घ्या जाणून...
Election 2026: धुरळा उडाला! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक
Assembly Elections 2026 AnnouncedSaam Tv
Published On

Summary:

  • ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर

  • पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम निवडणूक कार्यक्रम जाहीर

  • निवडणूक आयोगाने जाहीर केले मतदानाचे वेळापत्रक

  • ५ राज्यात १७.४ कोटी मतदार

चार राज्य आणि एक केंद्र शासित प्रदेशाच्या निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली. आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजले. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांचे वेळापत्रक आणि कार्यक्रम जाहीर केले. दिल्लीतील विज्ञान भवनात ही पत्रकार परिषद पार पडली. कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी मतदान आणि कोणत्या दिवशी निकाल लागणार हे आपण जाणून घेणार आहोत...

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, 'निवडणूक आयोगाने सर्व ५ राज्यांना भेट दिली. निवडणूक आयोगाने राज्य अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांची भेट घेतली आणि सर्वांकडून सूचना घेतल्या. पाच राज्यांमध्ये एकूण १७.४ कोटी मतदार आहेत. प्रत्येक बूथवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत.' तसंच, प्रत्येक मतदारांवर कॅमेऱ्याची नजर असेल. निवडणूक यादी तयार करण्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल निवडणूक आयोगाने बीएलओचे कौतुक केले.

Election 2026: धुरळा उडाला! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक
Baramati Election : महाराष्ट्रात विधानसभेच्या २ जागांसाठी निवडणुका जाहीर, मतदान कधी? निकालाची तारीख स्पष्ट

कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

तमिळनाडू -

तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून निकाल ४ मे २०२६ रोजी लागणार आहे.

पश्चिम बंगाल -

दोन टप्प्यात निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यासाठी २३ एप्रिल २०२६ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल २०२६ मतदान होणार आहे. तर निकाल ४ मे २०२६ रोजी लागणार आहे.

केरळ -

केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून त्याठिकाणी ९ एप्रिल रोजी २०२६ मतदान होणार आहे. तर निकाल ४ मे २०२६ रोजी निकाल लागणार आहे.

आसाम -

आसाममध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून ९ एप्रिल रोजी २०२६ रोजी मतदान होणार आहे. निकाल ४ मे २०२६ रोजी निकाल लागणार आहे.

पुदुच्चेरी -

पुदुच्चेरीमध्ये ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे आणि ४ मे २०२६ रोजी निकाल लागणार आहे.

Election 2026: धुरळा उडाला! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक
Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

कोणत्या राज्यात किती मतदार?

पश्चिम बंगाल -

एकूण मतदार: सुमारे ६.४४ कोटी

पुरुष: ३.२८ कोटी

महिला: ३.१६ कोटी

तृतीय लिंग: १,१५२

तामिळनाडू -

एकूण मतदार: सुमारे ५.६७ कोटी

पुरुष: २.७७ कोटी

महिला: २.८९ कोटी

तृतीयपंथी: ७,६१७

केरळ -

एकूण मतदार: सुमारे २.७० कोटी

पुरुष: १.३१ कोटी

महिला: १.३८ कोटी

तृतीयपंथी: २७७

आसाम -

एकूण मतदार: सुमारे २.५० कोटी

पुरुष: १.२५ कोटी

महिला: १.२५ कोटी

तृतीयपंथी: ३४३

पुदुच्चेरी -

एकूण मतदार: सुमारे ९.४४ लाख

पुरुष: ४.४३ लाख

महिला: ५ लाख

तृतीयपंथी: १३९

Election 2026: धुरळा उडाला! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक
Assembly Election: ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी, ४०हजार मतमोजणी अधिकारी...; कशा पार पडतील ५ राज्यांमधील निवडणुका?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com