राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चारही राज्यांचे कल हाती आले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सुरूवातीला चारही राज्यांमध्ये कॉँग्रेसने जोरदार आघाडी घेतली होती. चारही राज्यांमध्ये कॉँग्रेसची सत्ता येईल, असेच वातावरण होते.
मात्र जसे- जसे निकाल हाती येतील तसे भाजपने जोरदार मुसंडी मारली असून कॉंग्रेसला जोरदार धक्का दिल्याचे दिसत आहे. चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. धक्कादायक म्हणजे कॉंग्रेसच्या छत्तीसगड अन् राजस्थान ही दोन्ही राज्ये कॉंग्रेसच्या हातातून निसटण्याची चिन्हे दिसत आहेत.
समोर आलेल्या कलांनुसार मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेशमध्ये भाजपने मोठा विजय संपादन केला असून तब्बल १५९ जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे, तर कॉँग्रेस ६७ जागांवर आघाडीवर आहे.
राजस्थानमध्येही (Rajasthan) भाजपने बहुमताचा आकडा पार केला असून काँग्रेसच्या हातून हे राज्यही जाण्याची चिन्हे दिसत आहेत. राजस्थानमध्ये भाजप १०० तर कॉंग्रेस ७८ जागांवर आघाडीवर आहे. राज्यात सत्ता असूनही पराभवाची नामुष्की ओढावल्याने कॉंग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
मध्यप्रदेश, राजस्थानप्रमाणेच छत्तीसगडमध्येही कॉंग्रेसला जोर का झटका बसलाय. सुरुवातीच्या कलामध्ये आघाडीवर असलेले कॉंग्रेस या राज्यातही पिछाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये भाजप ४८ जागांसह आघाडीवर आहे तर कॉंग्रेस ४१ जागांवर आघाडीवर आहे. सध्या भाजप पुढे असले तरी छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला अद्याप आशा आहेत.
तेलंगणात कॉंग्रेसला साथ..
चार राज्यांपैकी केवळ तेलंगणामध्येच (Telangana) जनतेने कॉंग्रेसला साथ दिल्याचं दिसतयं. तेलंगणामध्ये कॉंग्रेसने बहुमताचा आकडा गाठला असून ६६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसला ४५ जागा मिळताना दिसत आहेत.
एक्झिट पोल, ठरले फोल...
दरम्यान, या निकालांआधी एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) चारही राज्यांमध्ये कॉंग्रेसला चांगले यश मिळत असल्याचे भाकित वर्तवले होते. मात्र समोर आलेल्या निकालांनुसार हे सर्व आकडे फोल ठरल्याचे दिसत आहे. लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत महाविजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.