Maratha Reservation: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाबाबत चर्चा व्हावी; खासदार राहुल शेवाळे यांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

shinde Group leader Rahul Shewale On Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठकीत शिंदे गटाचे खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाबाबत चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे.
Maratha Reservation Dharashiv News
Maratha Reservation Dharashiv NewsSaam tv news
Published On

आवेश तांदळे, मुंबई

Rahul Shewale On Maratha Reservation:

मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यात मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. तर धनगर समाजाने अनुसूचित जमातीतून आरक्षणाची मागणी केली आहे. दोन्ही समाजातील नेत्यांनी आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा लावून धरला आहे. यावरून सर्वपक्षीय बैठकीत शिंदे गटाचे खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाबाबत चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे. (Latest marathi News)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी , केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती नोंदवली. आगामी अधिवेशनात होणाऱ्या कामकाजाचा प्राथमिक आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला खासदार राहुल शेवाळे यांनीही हजेरी लावली. या बैठकीत खासदार शेवाळे आरक्षणाचा मुद्दा मांडला.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation Dharashiv News
Raj Thackeray News: 'वडापाव पाहिला की, मला...'; वडापाव-मिसळवरून राज ठाकरेंची शिंदे सरकारवर मिश्किल टिप्पणी

'मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण या दोन प्रलंबित मागण्यांमुळे महाराष्ट्रात सामाजिक वातावरण गढूळ झालं आहे. ओबीसी आराक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आणि एस टी प्रवर्गाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित प्रयत्न करणे गरजे आहे, असं खासदार शेवाळे यांनी बैठकीत अधोरेखित केले. या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला सहकार्य करावे, अशी विनंती या बैठकीत शेवाळे यांनी केली.

Maratha Reservation Dharashiv News
Shivsena MLA Disqualification Case: तब्बल ३१८ प्रश्न, जशासं तसं उत्तर... अखेर सुनील प्रभूंची उलट तपासणी संपली; आज काय घडलं?

मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीची आढावा बैठक

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिंदे समितीसोबत आढावा बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे, भोसले आणि गायकवाड उपस्थिती लावली आहे. या बैठकीत शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जात आहे.

या बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे समितीकडून आता ज्यांच्याकडे कुणबी दाखले नाहीत, त्यांचीही माहिती गोळा केली जाणार आहे.

याबाबत राज्यातील जिल्हाधिकारी यांना २२ प्रश्न असलेले फॉर्म देऊन मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र नसलेल्या नागरिकाकडून हे फॉर्म भरून घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. तसेच मराठा समाजाच्या नोंदी आतापर्यंत किती सापडल्या, याचा आढावा याबैठकीत घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com