आवेश तांदळे, मुंबई
'आज वडापाव पाहिला की, मला आज राज्य सरकारची आठवण येते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वडा अजित पवार आहे का? की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकनाथ शिंदे आहे हेच कळत नाही, अशी मिश्किल टिप्पणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. (Latest Marathi News)
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे गोरेगाव येथे वडापाव महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. या महोत्सवातील उपस्थितांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केलं. तसेच यावेळी वडापाव-मिसळवरून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) शिंदे सरकारवर मिश्किल टिप्पणी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज ठाकरे म्हणाले, 'आज वडापाव (Vada Pav) महोत्सव आहे कळाले होते, पण इथे आल्यावर समजले की हे प्रमोशन आहे. हे अभिनेते डायट करतात, आपल्याला लंडन मिसळ, जिलेबी चित्रपट काढतात. आज चांगले वाटले की आपल्यासोबत वडापावचे जनक आहेत, त्यांच्या कुटंबीयांचा सत्कार करण्यात आला. खरं पहिलं तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला पाहिजे'.
वडापावविषयी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले,'अशोक वैद्य यांनी वडापावची संकल्पना राबवली. आमच्या अशोक वैद्य यांनी सुरु केलेला एक वडापाव आज लंडनमध्ये खातात. आज वडापाव अनेक ठिकाणी पोहोचला आहे. मी आजपर्यंत वाईट वडापाव खाल्ला नाही. अशोक वैद्य यांनी वडापाववर कितीतरी पिढ्या उभ्या केल्या'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.