Telangana Election Results : तेलंगणात ओवेसींच्या पक्षाला धक्का, मुस्लिम मतांचे समीकरण बिघडले?

Telangana Election Results Live: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM)अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाला तेलंगणातील 119 जागांवर सुरू असलेल्या मतमोजणीत मोठा धक्का बसला आहे.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSaam TV
Published On

Telangana Assembly Election Results Live:

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM)अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाला तेलंगणातील 119 जागांवर सुरू असलेल्या मतमोजणीत मोठा धक्का बसला आहे. ओवेसींचा पक्ष सर्व जागांवर पिछाडीवर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 7 जागा मिळाल्या होत्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस 67 जागांवर तर बीआरएस 37 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे. येथे काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात थेट लढत आहे.

Asaduddin Owaisi
2023 Telangana Election Result: तेलंगणात काँग्रेसची आघाडी, आमच्या आमदारांवर BRS ची नजर: डीके शिवकुमार

सकाळी 9.45 पर्यंतच्या ट्रेंडमध्ये ओवेसींचा पक्ष 5 जागांवर आघाडीवर होता, मात्र आता ते मागे पडताना दिसत आहे. ओवेसी हे स्वतः हैदराबादचे खासदार आहेत आणि हा भाग त्यांचा प्रभाव क्षेत्र मानला जातो. (Latest Marathi News)

यामुळेच त्यांनी या भागात सर्व उमेदवार उभे केले आहेत. त्यांना मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा आहे आणि त्यांच्या बळावर ओवेसी अनेक दिवसांपासून येथे चांगले काम करत आहेत.

Asaduddin Owaisi
Chhattisgarh, Telangana Assembly Election 2023 Results LIVE: तेलंगणात काँग्रेसचा १० जागांवर विजय

ओवेसी यांचे कुटुंब हैदराबाद मतदारसंघातून राजकारण करते. 2018 च्या निवडणुकीत त्यांना या जागेवर सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी BRS ला 119 पैकी 88 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 21 तर एआयएमआयएमला 7 जागा मिळाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com