assembly election results 2023 Congress start Celebration at Congress's headquarters in Delhi Congress in Assembly Election 2023-Saam TV
देश विदेश

Assembly Election 2023 Celebration: ढोल.. ताशे.. मिठाई.. पोस्टर्स... काँग्रेसचं निवडणुकीच्या निकालाआधीच सेलिब्रेशन सुरु

Congress Celebration over Assembly Election 2023 (Latest Update): दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच जोश आणि उत्साह पाहायला मिळत आहे. निकालाआधीच ढोल वाजवून विजयाचा जल्लोष करताना दिसले.

प्रविण वाकचौरे

Congress Celebration Over Assembly Election 2023 Result:

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा  निवडणुकांचे निकाल आज समोर येणार आहे. दरम्यान निवडणुकीचा निकाल जाहीर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात विजयोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे.

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच जोश आणि उत्साह पाहायला मिळत आहे. निकालाआधीच ढोल वाजवून विजयाचा जल्लोष करताना दिसले. मिठाई आणली गेली आहे. बॅनरबाजी देखील सुरु झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. प्रभू श्रीरामाचे पोस्टर्स देखील कार्यकर्त्यांच्या हाती दिसत आहे. चारही राज्यात काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा दावा देखील कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टर्सवर श्रीरामाचे फोटो आहेत. याशिवाय पोस्टरवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या फोटोसह अनेक घोषणा लिहिल्या आहेत. राहुल सब पर भारी है, तभी तो भाजप जा रही है.., अशा घोषणा पोस्टर्सवर लिहिण्यात आल्या आहेत.

सुरुवातीचे कल

मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीचे जे कल समोर आले आहेत, त्यात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप १२८ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ९९ जागांवर आघाडीवर आहे.

राजस्थानात देखील भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप ९९ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ८३ जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसत आहे.

काँग्रेस ५५ तर भाजप ३३ जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेस बीआरएसच्या सत्तेला सुरुंग लावताना दिसत आहे. काँग्रेसने सुरुवातीच्या कलांमध्ये विजयी आघाडी घेतली आहे. काँग्रेस ६१, बीआरएस ३५ तर भाजप ११ जागांवर आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर फेकले कांदे; नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला|VIDEO

CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलं

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

Saam Impact : बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन! मुख्यमंत्र्यांचे आदेश; साम टीव्हीचा दणका

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडच्या १००० कोटीची प्रॉपर्टी जप्त करा; रोहित पवारांची मागणी

SCROLL FOR NEXT