Assembly Election Result 2023: रिझल्टच्या आधी रिसॉर्ट तयार, काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या; DK शिवकुमारांनी आखला मास्टर प्लॅन!

Madhya Pradesh, Rajasthan, chhattisgarh, Telangana Assembly Election Result 2023 : कॉंग्रेसने तेलंगणामध्ये विजयाकडे वाटचाल सुरू केली असून आमदारांची पळवापळवी टाळण्यासाठी कॉंग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Assembly Election Results 2023 Live Updates
Assembly Election Results 2023 Live UpdatesSaamtv
Published On

Assembly Election Result 2023 Marathi News:

देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेची सेमिफायनल म्हणून या निवडणूकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या चार राज्यांमध्ये कोण विजयी गुलाल उधळणार अन् कोणाची विकेट पडणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार तेलंगणामध्ये कॉंग्रेसने बीआरएसला धक्का देण्यास सुरूवात केली आहे. कॉंग्रेसने तेलंगणामध्ये विजयाकडे वाटचाल सुरू केली असून आमदारांची पळवापळवी टाळण्यासाठी कॉंग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हात येत आहेत. यामध्ये सर्वच राज्यात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. अशात आमदारांची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकांमधील ऑपरेशन लोटसचा फटका बसलेल्या कॉंग्रेसने यावेळी जोरदार तयारी केली आहे. कॉंग्रेसकडून चारही राज्यातील विजयी आमदारांना हैद्राबादमध्ये आणण्याची शक्यता आहे.

सर्व आमदारांना एकाच रिसॉर्टमध्ये ठेवण्याच्या सुचना कॉंग्रेस हायकमांडने दिल्यात. यासाठी कर्नाटक कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार हैद्राबादमध्ये दाखल झाले आहेत. तसेच काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघात एक आमदार पाठवण्यात येणार आहे. विजयी आमदाराला हैदराबादला आणण्याची जबाबदारी कर्नाटकच्या आमदारांवर सोपवण्यात आली आहे.

   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Assembly Election Results 2023 Live Updates
Assembly Election Results 2023: राजस्थानसह ४ राज्यांमध्ये कोणाचे सरकार येणार? लोकसभेच्या सेमीफायनलचा आज निकाल

तेलंगणामध्ये कॉंग्रेसची विजयी घौडदौड....

दरम्यान, तेलंगणामध्ये कॉंग्रेसने बीआरएसला जोरदार धक्का दिला आहे. सुरूवातीच्या कलामध्ये कॉंग्रेस बीआरएसपेक्षा दुप्पट जागांनी आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये कॉंग्रसला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. तेलंगणामध्ये शेवटचे कल हाती आले तेव्हा काँग्रेस ६०, बीआरएस ३५, तर भाजपने ५ जागांवर आघाडी घेतली होती. (Latest Marathi News)

Assembly Election Results 2023 Live Updates
Recruitment News : खुशखबर! राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरतीला मुदतवाढ, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com