Telangana Exit Poll 2023: तेलंगणाच्या एक्झिट पोलवर संपतापले मुख्यमंत्री KCR चे पुत्र, निवडणूक आयोगावर केला राग व्यक्त; पाहा VIDEO

Telangana Assembly Election Exit Poll Result: तेलंगणाच्या एक्झिट पोलवर संपतापले मुख्यमंत्री KCR चे पुत्र, निवडणूक आयोगावर केला राग व्यक्त; पाहा VIDEO
K. T. Rama Rao
K. T. Rama RaoSaam Tv
Published On

K. T. Rama Rao On Telangana Assembly Election Exit Poll Result :

तेलंगणाच्या 119 सदस्यीय विधानसभेसाठी गुरुवारी झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोलचे निकालही आले आहेत. मतदान संपताच सायंकाळी साडेपाच वाजता एक्झिट पोलचे निकाल येण्यास सुरुवात झाली. 2014 मध्ये स्थापन झालेल्या राज्यात पहिल्यांदाच चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

एक्झिट पोलमध्येही काँग्रेस पक्ष सत्ताधारी बीआरएसवर (भारत राष्ट्र समिती) आघाडी घेत असल्याचे दिसत आहे. मात्र एक्झिट पोलच्या निकालावर सत्ताधारी पक्षाने संताप व्यक्त केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांचे पुत्र केटी रामाराव (KTR) यांनी एक्झिट पोलचे निकाल मूर्खपणाचे असल्याचं म्हटलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

K. T. Rama Rao
Chhattisgarh Exit Polls 2023: छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता राखणार की भाजप देणार धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण पुढे? जाणून घ्या

केटीआर यांनी संध्याकाळी 5:30 पासून एक्झिट पोल जाहीर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. एक्झिट पोलवर बीआरएस नेते केटीआर म्हणाले, "हा एक अतार्किक एक्झिट पोल आहे. लोक अजूनही मतदान करत आहेत... भारतीय निवडणूक आयोगाचा निर्णय देखील हास्यास्पद आहे की, त्यांनी याला 5:30 वाजता नियोजित करण्याची परवानगी दिली. मात्र लोक रात्री 9 वाजेपर्यंत मतदानासाठी रांगेत उभे असताना. मला वाटते की हे खूप हास्यास्पद आहे... मी येथे आलो आहे कारण मला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की, हे मूर्खपणाचे आहे आणि यावर विश्वास ठेवू नका.'' (Latest Marathi News)

गुरुवारी बीआरएस मुख्यालयात माध्यमांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, त्यांना विजयाचा विश्वास आहे. परंतु अधिकाऱ्यांनी मतदारांवर एक्झिट पोल जारी करण्याची परवानगी दिल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. ते म्हणाले, "मी तेलंगणाच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना फोन केला आणि त्यांना विचारले की लोक रांगेत उभे असताना ते (एक्झिट पोल) निकाल कसे प्रसारित करू शकतात. सर्वांना माहित आहे की, काँग्रेस मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे."

K. T. Rama Rao
Rajasthan Exit Polls 2023 : राजस्थानमध्ये परंपरा मोडणार की भाजप येणार सत्तेत? एक्झिट पोलमध्ये कोणाला किती जागा? जाणून घ्या

वर्ष 2018 च्या निवडणुका आणि मतदानाच्या दिवशी प्रसारित झालेल्या पाच एक्झिट पोलची आठवण करून देत केटीआर म्हणाले की, त्यावेळचे पाच पैकी फक्त एकच एक्झिट पोल बरोबर असल्याचे सिद्ध झाले होते. ते म्हणाले, “आम्ही असे एक्झिट पोल पाहिले आहेत. मी विश्वासाने संगीतो की, 3 डिसेंबरला आम्ही 70 हून अधिक जागांसह परत येऊ.''

दरम्यान, तेलंगणात बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत आहे. बीआरएस सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचे लक्ष्य ठेवत असताना, काँग्रेसला राज्यात पहिल्यांदा सरकार स्थापन करण्याचा विश्वास आहे. बीआरएस सर्व 119 जागा स्वबळावर लढवत आहे. काँग्रेसने आपला मित्रपक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासाठी (सीपीआय) एक जागा सोडली आहे. भाजप हा रिंगणातील तिसरा प्रमुख दावेदार आहे आणि तो सत्ताविरोधी मते कमी करून निकालावर प्रभाव टाकू शकतो. भाजपने 111 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत आणि उर्वरित आठ उमेदवार अभिनेता-राजकारणी पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जनता सेना पक्षासाठी (JSP) सोडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com