Chhattisgarh Exit Polls 2023: छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता राखणार की भाजप देणार धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण पुढे? जाणून घ्या

Chhattisgarh Exit Polls Result : छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. सर्व एक्झिट पोलमध्ये, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे, तर भाजप अजूनही चुरशीच्या शर्यतीत आहे.
Chhattisgarh exit Polls Result :
Chhattisgarh exit Polls Result :Saam Tv

Chhattisgarh Exit Polls 2023:

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. सर्व एक्झिट पोलमध्ये, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे, तर भाजप अजूनही चुरशीच्या शर्यतीत आहे. यावेळीही राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात निकराची लढत असल्याचे मानले जात आहे. असं असलं तरी हे एक्झिट पोल केवळ अंदाज आहेत.

यातच कोणाचे सरकार स्थापन होणार आणि कोण विरोधी पक्षात बसणार हे 3 डिसेंबरला होणाऱ्या निवडणूक निकालावरूनच कळेल. यावेळी राज्यातील सर्व 90 विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. या काळात काही नक्षलग्रस्त ठिकाणी तुरळक घटनाही पाहायला मिळाल्या. यावेळी छत्तीसगडमधील 90 विधानसभा मतदारसंघांपैकी 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक मतदान केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhattisgarh exit Polls Result :
Rajasthan Exit Polls 2023: राजस्थानमध्ये परंपरा मोडणार? काँग्रेस पुन्हा येणार सत्तेत? एक्झिट पोलमधून समोर आली 5 कारणे...

राज्यात दोन टप्प्यात झालेल्या मतदानात एकूण 1 कोटी 55 लाख 61 हजार 460 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यात 77 लाख 48 हजार 612 पुरुष तर 78 लाख 12 हजार 631 महिला मतदारांचा समावेश आहे. अशा प्रकारे विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या एकूण महिला मतदारांची संख्याही एकूण पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. छत्तीसगड निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 75.8 टक्के मतदान झाले. (Latest Marathi News)

एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला आघाडी

एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 57 जागा मिळताना दिसत आहे. तर भाजपला 33 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Chhattisgarh exit Polls Result :
Madhya Pradesh EXIT POLL: मध्य प्रदेशमध्ये BJP आणि Congress मध्ये चुरस का वाढली? दोन्ही पक्षांना सत्ता मिळणं का झालं अवघड?

पोलस्टार्ट एक्झिट पोल

पोलस्टार्ट एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 40-50 मिळताना दिसत आहे. तर भाजपला 35-45 जागा मिळताना दिसत आहे. याशिवाय इतरांच्या खात्यात 3 जागा दिसत आहे. म्हणजेच यामध्ये काँग्रेस राज्यात सत्ता स्थापन करू शकते, असं दिसत आहे.

CNX एक्झिट पोल

CNX एक्झिट पोलमध्येही काँग्रेस पुन्हा सत्तेत येत असल्याचं दिसत आहे. यात काँग्रेसला 46-56, भाजपला 30-40 आणि इतर पक्षांना 03-05 जागा मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टाईम्स नाऊ-ईटीजी

टाईम्स नाऊ- ईटीजीच्या एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेस एक मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याचे दिसते आहे. ज्याला 48 ते 56 जागा मिळू शकतात तर भाजप 32 ते 40 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com