Swasthyam: संवादातून तणाव दूर ठेवा; 'स्वास्थ्यम'च्या उपक्रमात 'झिम्मा २'मधील कलाकारांचा सल्ला

Suhana Sakal Swasthyam 2023: आयुष्यातील तणाव दूर कसा करावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'झिम्मा2' चित्रपट. महिलांनी मानसिक, शारीरिक आरोग्याविषयी कुटुंबीयांसमवेत व्यक्त व्हावं, असं आवाहन कलाकारांनी केलं आहे.
Suhana Sakal Swasthyam 2023
Suhana Sakal Swasthyam 2023 Saam tv
Published On

Suhana Sakal Swasthyam 2023:

वेगवेगळ्या स्वभावाच्या महिला या सहलीला जाण्याच्या निमित्ताने 'झिम्मा'मध्ये एकत्रित येतात. याच स्त्रिया एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारत मनसुद्धा मोकळे करून जातात. याचप्रकारने आयुष्यातील तणाव दूर कसा करावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'झिम्मा2' चित्रपट. महिलांनी मानसिक, शारीरिक आरोग्याविषयी कुटुंबीयांसमवेत व्यक्त व्हावं, असं आवाहन कलाकारांनी केलं आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील ' स्वास्थ्यम्' उपक्रमात 'झिम्मा2' चित्रपटाच्या कलाकारांनी हजेरी लावली. या उपक्रमाला चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेत्री क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी भेट देत प्रेक्षकांशी संवाद साधला.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Suhana Sakal Swasthyam 2023
Maratha Reservation: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाबाबत चर्चा व्हावी; खासदार राहुल शेवाळे यांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

सिद्धार्थ चांदेकर म्हटला की, माणूस कुठलाही आजार उद्भवल्यास गुगलचा आधार घेताना दिसतो. इंटनेटयुगात व्यक्ती इंटरनेटचा आधार घेतल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही डॉक्टर नसाल तर तुम्ही गुगल करून डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करू नका. जे या विषयात तज्ज्ञ आहे, ज्यांचा अभ्यास आहे. त्यांच्याकडे जाऊनच उपचार घ्या'.

सायली काय म्हटली?

'आरोग्यविषयक किंवा मानसिक समस्या उद्भवल्यास त्याबाबत बोलायला घाबरू नका. आपले आई-वडील आपल्यांवर खूप प्रेम करतात, ही बाब लक्षात ठेवा, असं सायलीने म्हटलं आहे.

चित्रपटाचा दिग्दर्शक काय म्हणाला?

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला की, 'आमच्या सारख्या कलावंताच्या आयुष्यात नेहमीच चढ-उतार येतात. आपल्या कामात स्थिरता नसल्याने तणाव येतो. अशा परिस्थितीत क्षिती माझं समुपदेशन करते. आपण अशा स्थितीमध्ये वाईटातून चांगले शोधायचा प्रयत्न करायला हवा. स्वतःला सकारात्मक ठेवणे गरजेचं आहे. आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींचा विचार करण्यापेक्षा जे चांगलं आहे, त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं'.

Suhana Sakal Swasthyam 2023
Sharad Pawar on Praful Patel: प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची वाट बघतोय, त्यांनी ईडीचा चॅप्टरही लिहावा; शरद पवारांचं प्रत्युत्तर

क्षिती जोग काय म्हणाली?

क्षिती जोग म्हणाली, 'व्यक्तीने दैनंदिन आयुष्य जगत असताना दुसरीकडे मानसिक आरोग्याला महत्व देणे गरजेचं आहे. वयोमानानुसार येणाऱ्या आरोग्यविषयक बदलांना कमी लेखू नका, असा सल्ला क्षिती जोगने दिला आहे. शारीरिक किंवा मानसिक समस्या उद्भवल्यास तज्ज्ञांकडे जायला लाजू नका, असंही क्षिती जागने म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com