MP Election Result: मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये 'काटे की टक्कर'? कोण मारणार बाजी? निवडणुकीचा निकाल कसा पाहणार? वाचा सविस्तर

Madhya Pradesh Election 2023: मध्य प्रदेशात उद्या रविवारी ३ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत सर्वच दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
MP Election Result
MP Election ResultSaam tv
Published On

Madhya Pradesh Election Result 2023:

मध्य प्रदेशात उद्या रविवारी ३ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत सर्वच दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस की भाजप बाजी मारणार, याकडे लागले आहे. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशात भाजपने शिवराज सिंह यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवली आहे. तर काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली.

मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचं पारडं जड असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मध्य प्रदेशात कोणाची जादू चालणार, याचं चित्र उद्या रविवारी 3 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MP Election Result
Voting Counting: मतमोजणी कशी केली जाते; voting वर उमेदवाराला संशय असेल तर? जाणून घ्या काय आहेत नियम?

निवडणुकीच्या निकालाआधीच दोन्ही पक्षाने जिंकण्याचा दावा केला आहे. दहा एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत आहे तर दोन ठिकाणी काँग्रेसला बहुमत आहे. तर इतर चार एक्झिट पोलमध्ये दोन्ही पक्षात 'काटे की टक्कर' असणार आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान झालं. या वेळी निवडणुकीत २५३३ उमेदवार रिंगणात आहेत. मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदा विक्रमी ७७.१५ टक्के मतदान झालं आहे. तर यावेळी ७८.२१ टक्के पुरुष आणि ७६.०३ महिलांनी मतदान केलं.

तर २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७५.२ टक्के मतदान झालं होतं. मध्य प्रदेशात उद्या ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर या निवडणुकीचे सकाळी १० वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

MP Election Result
Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशना 4 डिसेंबरपासून होणार सुरुवात, सरकारने राजकीय पक्षांच्या नेत्यांची घेतली बैठक

२०१८ साली मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला १०९ जागा तर काँग्रेसला ११४ जागा आल्या होत्या. बसपाला दोन तर सपा आणि अपक्षाला एक जागा मिळाली होती. २०१८ साली काँग्रेसने १५ वर्षांनंतर मध्य प्रदेशमध्ये सरकारची स्थापना केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com