संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज म्हणजेच रविवारी जाहीर होणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांची मतमोजणी सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. या निवडणुकांकडे मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे विजयासाठी भाजपसह काँग्रेसने आपली पूर्ण ताकद पणाला लावून दिली आहे.
राजस्थान वगळता अन्य चारही राज्यात भाजपाची पीछेहाट होईल, असा अंदाज विविध एजन्सीनी व्यक्त केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण असून भाजप नेत्यांना पराभवाची धास्ती आहे. मात्र, काँग्रेसचा हा आनंद किती काळ टिकणार, हे अवघ्या काही तासांतच कळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांच्यासह १ हजार ८६२ उमेदवारांच्या भवितव्यचा फैसला आज होणार आहे. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी निवडणुकीत २०० पैकी १९९ विधानसभा मतदारसंघात ७५.४५ टक्के मतदान झाले होते. राजस्थानमध्ये निवडणुकीची एक वेगळीच परंपरा आहे. (Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE)
१९९३ पासून कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा राज्यात सरकार स्थापन करता आलेलं नाही. राज्यात आळीपाळीने कधी भाजप तर कधी काँग्रेसचं सरकार आलं आहे. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजय झाला होता. आता काँग्रेस सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्यात यशस्वी होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या २३० जागांसाठी २५३३ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत सर्वच दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने शिवराज सिंह यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवली आहे. तर काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचं पारडं जड असल्याचं सांगण्यात येत आहे. (Madhya Pradesh Assembly Election 2023 Results)
तेलंगणात विधानसभेच्या ११९ जागांसाठी भाजप, काँग्रेस आणि बीआरएस पक्षात तिरंगी सामना रंगला आहे. त्यामुळे याठिकाणी कोणता पक्ष सत्ता काबिज करण्यात यशस्वी होतो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. २०१८ साली तेलंगणात बीआरस पक्षाने सत्ता स्थापन केली होती. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. (Telangana Assembly Election Results 2023)
छत्तीसगड विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी झालेलं मतदान ७ आणि १७ नोव्हेंबरला घेण्यात आलं. आता उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असून आज कुणाचा विजय होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ४६ ते ५६ तर भाजपला ३० ते ४० जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलने वर्तविली आहे. (Chhattisgarh Election Result 2023)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.