Rahul Gandhi Agniveer Scheme:  Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi : भय अन् भ्रमाचं जाळं तुटलं, पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधी यांची भाजपवर खरमरीत टीका

Rahul Gandhi On BJP: सात राज्यांतील 13 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यानंतर राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सात राज्यांतील 13 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. 13 जागांपैकी 10 जागा इंडिया आघाडीने जिकल्या आहेत. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला फक्त दोन जागा जिंकता आल्या. याशिवाय एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे.

पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाने अनेक नेत्यांनी जल्लोष साजरा जातात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी इंडिया आघाडीच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.

पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. X वर पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, "7 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांनी भाजपने विणलेलं भीतीचे आणि संभ्रमाचं जाळं तुटल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकरी, युवक, मजूर, व्यापारी, नोकरदार अशा प्रत्येक वर्गाला हुकूमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करायचं आहे. लोक आता त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी पूर्णपणे इंडियासोबत उभे आहेत. जय हिंदुस्थान, जय संविधान."

पश्चिम बंगालमधील चार जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या विजयाने ममता बॅनर्जी आनंदी आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, “अनेक कट रचले गेले. एका बाजूला केंद्रीय यंत्रणा, तर दुसरीकडे भाजप. या प्रकारची हुकूमशाही थांबवायची आहे. याच संपूर्ण श्रेय सामान्य नागरिकांना जातं.''

द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही इंडिया आघाडीच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले आहेत की, ''भाजपने पराभवातून धडा घेतला पाहिजे. प्रादेशिक भावनांचा आदर केल्याशिवाय भाजप सरकार आणि पक्ष चालवू शकत नाही, हे भाजपने समजून घेतले पाहिजे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT