Pandharpur Wari: राहुल गांधी वारीला येणार; शरद पवारांचं राहुल गांधींना वारीचं निमंत्रण

Rahul Gandhi Pandharpur wari: शरद पवारांनी निमंत्रण दिल्यानंतर राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहे. मात्र राहुल गांधींच्या वारीवरून राजकारण तापलंय. पवारांनी दिलेल्या निमंत्रणावर भाजपनं आक्षेप घेतलाय. त्यामुळे राहुल गांधीत वारीत सहभागी होतील तेव्हा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो. यावरचा हा रिपोर्ट
Pandharpur Wari: राहुल गांधी वारीला येणार; शरद पवारांचं राहुल गांधींना वारीचं निमंत्रण
Rahul Gandhi Pandharpur warisaam

राज्यात सर्वदूर टाळ-मृदुंगाचा गरज सुरू असून सगळीकडे वारीचं वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीत लाखो वारकरी सहभागी झाले असून पंढरीच्या दिशेनं त्यांच्या पावलं पडत आहेत. या वारीत दरवर्षी अनेक दिग्गज नेते अभिनेतेही सहभागी होतात. यंदा विरोधी पक्षनेते राहुल गांधीही 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी त्यांना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. हे निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलंय. वाखरीत राहुल गांधी वारीत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसनं दिलीय.

पवारांनी राहुल गांधींना दिलेल्या निमंत्रणावरून आता राजकारण सुरू झालंय. भाजपनं या निमंत्रणावरून टीका केलीय. तर या टीकेला पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

राहुल गांधी आणि शरद पवार यांना आजपर्यंत वारकरी आणि वारी दिसले नाहीत. आज त्या वारीत तुम्ही येत आहात. शरद पवार यांचे पाय हे गेल्या ८४ वर्षात वारी आणि पंढरपरकडे ते कोणत्या तोंडाने राहुल गांधींना वारी सहभागी होण्याचं निमंत्रण देता, अशी घणाघाती टीका भाजपचे अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष तुषार भोसले म्हणालेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींचा टेंपल रन लक्षवेधी ठरला होता. आता पहिल्यांदाच राहुल गांधी वारीला येत आहेत. यंदा वारीनंतर लगेचच विधानसभा निवडणुका येत असल्यामुळे मविआनं राहुल गांधींच्या वारीचं टायमिंग साधल्याची चर्चा रंगलीय.

Pandharpur Wari: राहुल गांधी वारीला येणार; शरद पवारांचं राहुल गांधींना वारीचं निमंत्रण
Rahul Gandhi News: राहुल गांधींचा दावा खोटा! पंजाबमधील कुटुंबाला पोहोचली ९८ लाखांची मदत; लष्कराची माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com