Assembly Bypolls Results: अयोध्येपाठोपाठ बद्रीनाथमध्येही भाजपचा मोठा पराभव, पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा दणदणीत विजय

By Election Result 2024 Updates: पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपला अनेक महत्त्वाच्या जागांवर पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.
अयोध्येपाठोपाठ बद्रीनाथमध्येही भाजपचा मोठा पराभव, पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा दणदणीत विजय
PM Narendra Modi, Amit Shah and Rahul GandhiSaam Tv
Published On

पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपला अनेक महत्त्वाच्या जागांवर पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. यातील सर्वात दणदणीत पराभव उत्तराखंडमधील बद्रीनाथ मतदारसंघात मानला जात आहे. बद्रीनाथ हे चार धाम अंतर्गत येत असून विविध पौराणिक ठिकाणी विकासकामे होत असतानाही हा पराभव भाजपसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रभू राम जन्मभूमीवर भाजपचा पराभव होईल, अशी शक्यताही कोणीही वर्तवली नव्हती. यातच अयोध्येला लागून असलेल्या बस्तीसह राम वन गमनाच्या मार्गावर असलेल्या प्रयागराज, चित्रकूट, नाशिक (यूपी) आणि रामेश्वरमच्या जागाही भाजपला गमवाव्या लागल्या. यातच आता बद्रीनाथमध्ये भाजपला धक्का बसला आहे.यातच धार्मिक स्थळांचा विकास करूनही स्थानिक मतदारांना आकर्षित करण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे का, असा प्रश्न उपस्थित विचारला जात आहे.

अयोध्येपाठोपाठ बद्रीनाथमध्येही भाजपचा मोठा पराभव, पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा दणदणीत विजय
Sakal Survey 2024: स्वतंत्र लढल्यास भाजपची सत्ता; मविआचं टेन्शन वाढणार? सकाळ सर्वेक्षणातून धक्कादायक कल

बद्रीनाथमध्ये राजेंद्र भंडारी 2022 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र त्यांनी नंतर काँग्रेस पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यानंतर येथे पोटनिडवणूक जाहीर झाली. भाजपनेही त्यांना बद्रीनाथ मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण राजेंद्र भंडारी लोकांचा विश्वास जिंकू शकले नाहीत आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस उमेदवार लखपत बुटोला यांनी त्यांचा पराभव केला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच बद्रीनाथमध्ये पुजारी आणि स्थानिक लोकांनी मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनात येथील पंडा समाजही सहभागी झाला होता. येथील व्हीआयपी दर्शन सुविधेमुळे सर्वसामान्य पर्यटकांना खूप त्रास होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्वीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील रहिवासी करत होते.

अयोध्येपाठोपाठ बद्रीनाथमध्येही भाजपचा मोठा पराभव, पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा दणदणीत विजय
Sakal Survey 2024: स्वतंत्र लढल्यास भाजपची सत्ता; मविआचं टेन्शन वाढणार? सकाळ सर्वेक्षणातून धक्कादायक कल

यावरून बराच गदारोळ झाला होता. चारधामबाबत केंद्र सरकारच्या मास्टर प्लॅनमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. बद्रीनाथ मास्टर प्लॅनबाबत स्थानिक पातळीवर कोणताही अभ्यास झाला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या बांधकामांमुळे कोणते नुकसान होऊ शकते का, याची माहिती घेण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत, असं येथील लोकांचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com