आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप जर स्वतंत्र लढली तर सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, अशी माहिती साम आणि सकाळच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मात्र महायुतीत म्हणजेच शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोबत घेऊन लढली तर फटका बसू शकतो, अशी माहितीही सर्वेक्षणातून समोर आली आहे.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर साम आणि सकाळने सर्वेसक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सर्वेक्षणासाठी राज्यभरातून 288 विधानसभा मतदारसंघातून 84529 मतदारांशी संवाद साधण्यात आला. त्यासाठी सकाळचे दोन हजारांवर सहकारी सहभागी झाले होते. मतदारांची निवड करतांना 48 लोकसभा मतदारसंघांना 288 विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आले. पुढे शहरी आणि ग्रामीण भागांची प्रभाग आणि जिल्हा परिषद गट अशी विभागणी करण्यात आली. भौगोलिक समतोल राखून संशोधन नमुने निवडण्यात आले आहेत. यासाठी स्तरीय यादृच्छिक नमुना संशोधन पद्धत वापरण्यात आली.
या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला की, विधानसभेत कोणत्या पक्षाला मतदान कराल? यावर उत्तर देताना 28.5 टक्के लोकांनी भाजपला पसंती दर्शवली आहे. तर 24 टाकेन लोकांनी काँग्रेसला आपली पसंती दर्शवली आहे. तसेच शरद पवार गटाला 14, ठाकरे गटाला 11.7, अजित पवार गटाला 4. 2 आणि शिंदे गटाला 06 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे.
यातच महाविकास आघाडीशिवाय ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांचं नुकसान होऊ शकतं, असं दिसत आहे. मात्र मविआ एकत्र लढण्यास त्यांना फायदा होऊ शकतो, असंही या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. यातच स्वतंत्र निवडणूक लादल्यास सर्वाधिक नुकसान हे अजित पवार गटाचे होते होताना दिसत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.