IPS Officer Shiladitya Chetia Saam Tv
देश विदेश

IPS Officer Death: पत्नीच्या मृत्यूचं दुःख सहन झालं नाही, IPS अधिकाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

IPS Officer Shiladitya Chetia : शिलादित्य चेतिया यांचे पत्नीवर इतके प्रेम होते की त्यांच्या निधनाचे दुःख त्यांना सहन झाले नाही. कॅन्सरमुळे त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. पत्नीच्या निधनाचा फोन येताच काही वेळातच शिलादित्य चेटिया यांनी आत्महत्या केली.

Priya More

पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याच्या आणि त्यामधून हत्या झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. पण आसाममधील एका आयपीएस अधिकाऱ्याने पत्नीच्या मृत्यूचं दु:ख सहन न झाल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयपीएस अधिकारी (IPS Officer) आणि आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी आत्महत्या केली. आपल्याच सर्व्हिस रिव्हालव्हरने त्यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

शिलादित्य चेतिया यांचे पत्नीवर इतके प्रेम होते की त्यांना विभक्त होण्याचे दुःख सहन होत नव्हते. कॅन्सरमुळे त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. पत्नीच्या मृत्यूनंतर काही वेळातच शिलादित्य चेटिया यांनीही आत्महत्या केली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. आसाम सरकारमध्ये गृह आणि राजकीय विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी आत्महत्या केल्याची माहिती आसाम पोलिसांनी दिली. पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांची पत्नी कॅन्सरने त्रस्त होती. पत्नीच्या निधनाचे वृत्त कळताच शिलादित्य यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली.

आसामचे पोलिस महासंचालक जीपी सिंग यांनी आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांच्या मृत्यूची माहिती जनतेला दिली. पत्नीचे कॅन्सरमुळे निधन झाल्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. शिलादित्य चेतिया २००९ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा म्हणजेच आयपीएस अधिकारी होते. त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत: वर गोळी झाडली. राज्याचे गृहसचिव म्हणून पोस्टिंग करण्यापूर्वी चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम केले होते. चेतियाच्या पत्नीला ब्रेन ट्युमरचा त्रास होता आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिलादित्य चेतिया यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तिथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मृत्यूमागचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेने आसाममध्येच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स शिलादित्य चेतियाच्या पत्नीवरील प्रेमाचे कौतुक करत आहेत. तर काही युजर्सनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत शिलादित्य चेतियाने धैर्याने वागायला हवे होते, असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT