Residents rush out of their homes in Guwahati after a 5.9 magnitude earthquake hit Assam’s Udalguri district. Saam Tv
देश विदेश

Earthquake News: आसाम हादरलं! ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने गुवाहाटीमध्ये धावपळ

Panic in Assam: आसाममध्ये रविवारी सायंकाळी ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. गुवाहाटी सह अनेक भागात धक्के जाणवले. नागरिक घाबरून घराबाहेर धावले. कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेले नाही.

Omkar Sonawane

भूकंपाच्या धक्क्याने आसाम पुन्हा हादरले. आसामच्या गुवाहाटीमध्ये ५. रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. आसामच्या उदलगुरी सेक्टर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसामच्या काही भागांमध्ये रविवारी सायंकाळी ४.४१ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. आसामच्या उत्तर पूर्व भागामध्ये हे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्रबिंदू उदलगुरी जिल्ह्यात होते. भूकंपाची खोली ५ किमी इतकी नोंदवली गेली. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गुवाहाटी शहरातील अनेक परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. जमीन हादरल्यामुळे नागरिक घाबरले आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के जाणवत असताना ते थांबणारच नाही असे वाटत होते. असं वाटत होते की आता घराचं छत कोसळेल'

आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भूकंपाबाबत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना.' भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर आसाममधील नागरिकांनी सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आसामच्या सोनितपूरमध्ये ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind W Vs Aus W : टीम इंडियाचा दारूण पराभव, भारताने सामना ८ विकेट्सने गमावला

Parbhani: पान टपरी बैलगाडीतून नेताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून तिघांचा जागीच मृत्यू

पिंपरी चिंचवडची ऐतिहासिक शान – जगातील सर्वात उंच संभाजी महाराज स्मारक|VIDEO

India vs Pakistan : भारतीय गोलंदाजांनी फिरकीचा फास आवळला, पाकिस्तान संघाचा किल्ला कोसळला, टीम इंडियाला किती धावांचे आव्हान?

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्या – आगरी समाजाची ठाम मागणी|VIDEO

SCROLL FOR NEXT