Gaurav Bhatia viral video pajama controversy in live debate
BJP spokesperson Gaurav Bhatia faces embarrassment as viral video from TV debate sparks meme fest.Viral Video News

Viral Video : भाजप नेता Live डिबेटमध्ये पायजामा न घालताच बसले, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Gaurav Bhatia wardrobe malfunction viral video : भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया लाईव्ह डिबेटदरम्यान पायजमा न घालता दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांकडून मिम्सचा पूर, तर विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड.
Published on
Summary
  • भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांचा लाईव्ह डिबेटमधील पायजमा वाद व्हायरल.

  • व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच मिम्सचा पाऊस.

  • समाजवादी पक्षाने भाजपवर निशाणा साधत भाटियांना अश्लील संबोधलं.

  • नेटकऱ्यांनी खिल्ली उडवत भाटियांच्या कृतीवरून जोरदार चर्चा सुरू.

  • हा प्रकार १२ सप्टेंबर रोजीच्या प्राइम टाइम डिबेट शोमध्ये घडला.

BJP spokesperson Gaurav Bhatia faces embarrassment as viral video from TV debate sparks meme fest : न्यूज चॅनलच्या डिबेट शोमध्ये अनेकदा वाद अन् हाणामाऱ्या झाल्याचे पाहायला मिळते. त्या घटनेचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात अन् नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगते. असाच एक व्हिडिओ भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांचा व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये गौरव भाटिया चक्क पायजमा न घालताच उपस्थित होते. हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मिम्सचा पाऊस पाडला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांचा हा व्हिडिओ १२ सप्टेंबर रोजीचा आहे. ते घरामधून व्हिडिओ कॉलद्वारे या डिबेटमध्ये सहभागी झाले होते.

लाईव्ह डिबेटमध्ये नेमकं काय घडलं ?

एका वृत्तवाहिनीच्या प्राइम टाइमच्या डिबेटमध्ये गौरव भाटिया सहभागी झाले होते. वृत्त निवेदकाने भाटिया यांची ओळख करून दिली अन् ते कॅमेऱ्यासमोर आले. पण त्यावेळी भाटिया यांनी पायजमाच घातला नसल्याचे दिसले. हे सर्व लाईव्ह कॅमेऱ्यात दिसत असल्याचे समजताच त्यांनी कुर्त्याने सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला. कदाचित भाटिया यांना वाटलं असेल की कॅमेरा फक्त कमरेच्या वरचं दृश्य दाखवेल. पण कॅमेऱ्यामुळे नको ते व्हायरल झाले. 'वॉर्डरोब मालफंक्शन'चा हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत भाटिया हे आपले पाय झाकण्याचा प्रयत्न करत असताना दिसत होते, पण तोपर्यंत नेटकऱ्यांनी हा प्रकार हेरला अन् सोशल मीडियावर व्हायरल केला.

सोशल मीडियावर मिम्सचा पूर

'वॉर्डरोब मालफंक्शन'चा भाटियांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मिम्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनी भाटियांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. मजेशीर मीम्स, विनोदी कमेंट्स आणि टोमण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काहींनी त्यांच्या या चुकेची तुलना कॉर्पोरेट व्हिडिओ कॉलमधील एका गमतीदार घटनेसोबत केली.

विरोधकांनी टीकेची झोड उडवली -

गौरव भाटिया यांचा हा व्हिडिओ समाजवादी पक्षाच्या मीडिया सेलने एक्स खात्यावर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधलाय. त्यांनी X वर लिहिले, "भाजपचे बेशरम, अश्लील प्रवक्ते गौरव भाटिया टीव्ही डिबेटमध्ये पायजमा न घालता बसलेत. यांना लाज वाटत नाही का? हा प्रकार भाजपचा खरा चेहरा दाखवतो. दिवसभर दुसऱ्यांबद्दल बडबड करतात, पण त्यांचं खरं चरित्र आणि वर्तन सर्वांसमोर उघड झालं आहे." एका युजर्सने भाटियांवर टीका करताना म्हटले की, ते व्हिडिओ कॉलद्वारे टीव्ही डिबेटमध्ये पँट न घालता बसले. भाटिया यांनी कॅमेरा फ्रेम तपासली नव्हती का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com