rupali chakankar sister  Saam tv
देश विदेश

रुपाली चाकणकरांचं टेन्शन वाढलं; अशोक खरात प्रकरणी पोलिसांनी बहिणीला पाठवली नोटीस

rupali chakankar sister : रुपाली चाकणकरांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अशोक खरात प्रकरणी पोलिसांनी बहिणीला नोटीस पाठवली आहे.

Vishal Gangurde

अशोक खरात प्रकरणी मोठी अपडेट

खरात १०० बँक खात्यांचा नॉमिनी

आता पोलिसांनी प्रतिभा चाकणकरांना पाठवली नोटीस

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अशोक खरात प्रकरणात एक पाठोपाठ नवीन खुलासे समोर येत आहे. शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने ७ महिन्यांच्या गरोदर महिलेवरही लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. नराधम अशोक खरातने कोट्यवधीची माया देखील कमावल्याचे उघड झालं आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून खरातच्या संबंधितांनाही नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. शिर्डी पोलिसांनी आता रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा यांनाही नोटीस धाडली आहे.

अशोक खरातचे नाशिक, अहिल्यानगरमध्ये कोट्यवधींची संपत्ती आहे. त्याचे शेकडो बँक खात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झालं आहे. अशोक खरात १३२ बँक खात्याचा नॉमिनी आहे. याच प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची चौकशी होणार आहे. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे चार खाती आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन तर मुलांच्या नावे दोन खाती आहेत.

प्रतिभा चाकणकरांच्या बँक खात्यात २ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार देखील झाल्याचे समोर आलं आहे. याच प्रकरणात चौकशीसाठी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाणकर यांना नोटीस धाडली आहे. प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्त्यावर नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस मिळताच पाच दिवसाच्या आत चौकशीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती आहेत. 57 लोकांच्या नावे 100 खाती आहेत. 2021 साली एकाच दिवशी सर्व खाती उघडली गेली. 100 खात्यांवरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाला आहे. आत्तापर्यंत 33 खातेदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. आमच्या नावाची खाती असल्याचे माहित नाही, असा जबाब 33 खातेदारांनी पोलिसांना दिला आहे. तर आता प्रतिभा चाकणकर यांनाही चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. चाकणकर चौकशीला कधी हजर राहणार आणि त्यांच्या जबाबातून काय माहिती समोर येणार याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT