विकृत खरातला मोठा दणका, रुपाली चाकणकरांचंही टेन्शन वाढणार; शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार?

ashok kharat case : अशोक खरात प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. खरातच्या संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ashok kharat case update
ashok kharat caseSaam tv
Published On
Summary

अशोक खरात प्रकरणात चौकशीचा फेरा वाढल्याचे दिसत आहे

शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता

आर्थिक व्यवहार आणि ट्रस्ट कारभार तपासाच्या रडारवर आलाय

विकृत अशोक खरातचे अनेक कारनामे उघड होऊ लागले आहेत. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि बेकायदेशीर पद्धतीने कोट्यवधींची माया कमावणाऱ्या अशोक खरातची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विकृत अशोक खरातने स्थापन केलेल्या संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार आहे. तसेच अशोक खरातने कोट्यवधीची माया कशी कमावली, याचा शोध देखील पोलिसांकडून केला जाणार आहे.

भोंदूबाबा अशोक खरातच्या कृत्याने देशात खळबळ उडाली आहे. अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच्या कृत्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खरातला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. विकृत अशोक खरातला गुरू मानणाऱ्या रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या पदावरून पायउतार व्हावं लागलं. या प्रकरणात पोलिसांनी शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

ashok kharat case update
१०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या आणखी 'करामती'; एकापेक्षा एक कारनामे उघड

शिवनिका संस्थांनचे अध्यक्षद भोंदूबाबा अशोक खरातकडे होते. काही वर्षांपूर्वी जुन्या ट्रस्टींनी साथ सोडल्यानंतर नव्या विश्वस्तांची नियुक्ती केली होती. खरातने पत्नी आणि निकटवर्तीयांना विश्वस्तपदी बसवले होते. रुपाली चाकणकरही या संस्थानवर ट्रस्टी होत्या. विश्वस्त मंडळाची मुदत ऑगस्ट २०२५ मध्येच संपल्याचा खुलासा रुपाली चाकणकर यांनी केला होता. या प्रकरणात त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ashok kharat case update
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

अशोक खरात अटकेत गेल्यानंतर विश्वस्त मंडळाचा फलकही गायब झाला आहे. SIT कडून संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. मंदिर संस्थानमधील कारभार आणि आर्थिक व्यवहारही तपासाच्या रडारवर असल्याची माहिती हाती येत आहे.

तत्पूर्वी, पोलिसांच्या विशेष पथकाने ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कामगारांची चौकशी केली. SIT आणि नाशिक पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. मंदिराचा पुजारी, वॉचमन आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. मंदिर आणि बंगल्यातील हालचालींबाबत सविस्तर माहिती घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com