CM Arvind Kejriwal Saam TV
देश विदेश

CM Arvind Kejriwal : तिहार तुरुंगात CM केजरीवालांना पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन, रक्तातील साखरेची पातळी किती झाली? वाचा अपडेट

Ruchika Jadhav

कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरवींद केजरीवाल सध्या तिहार जेलमध्ये आहेत. येथे त्यांचे आजारपण आणि इन्सुलिनचा वाद वाढतच चालला आहे. केजरीवालांना इन्सुलिनची गरज असूनही त्यांना ते देण्यात येत नसल्याचा आरोप त्यांच्या पत्नी आणि कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर आता डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर तुरुंग प्रशासनाकडून केजरीवाल यांना इन्सुलिन देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये.

आजतक या माध्यम संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सोमवारी सायंकाळी अरविंद केजरीवाल यांची रक्तातील साखर ३०० पार म्हणजे ३२० वर पोहचली होती. त्यावर तुरुंग अधिकाऱ्यांनी एम्सच्या वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉलवरून बातचीत केली. त्यानंतर त्यांना इन्सुलिन देण्यात आलंय.

अरविंद केजरीवाल यांची शुगर मोठ्याप्रमाणावर वाढत असून त्यांना योग्य ते वैदकीय उपचार मिळत नाहीयेत. त्यांना मृत्यूच्या दारात ढकललं जात आहे, असे आरोप आपचे कार्यकर्ते तसेच सुनीता केजरीवाल यांनी केले होते. त्यानंतर शेकडो कार्यकर्ते तुरुंगाबाहेर हातात इन्सुलिन घेऊन तुरुंग प्रशासनाविरोधात प्रदर्शन करत होते.

दरम्यान, काल केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांची जेल प्रशासन आणि डॉक्टरांशी बातचीत झाली. त्यानंतर पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन मिळालं.

कथित दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयिन कोठडी आज संपणार आहे. केजरीवाल यांच्या अटकेवर आज पुन्हा राउज एवेन्यु कोर्टात सुनावणी होणार आहे. कालच कोर्टाने केजरीवाल यांच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी AIMS रुग्णालयातील डॉक्टरांची टीम बोलावली होती. आज EDकडून केजरीवाल यांना पुन्हा कोठडी मिळावी यासाठी युक्तीवाद केला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT