आंध्र प्रदेशातील पुंगनूर नगरपालिकेत वायएसआर काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील गटनेते आणि राजमपेटचे खासदार पी.व्ही. मिथुन रेड्डी यांच्या ताफ्यावर गुरुवारी हल्ला झाला असून TDP च्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला. ताफ्यातील वाहनांवर दगडफेक करत काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा दावा वायएसआरसीपीने केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वायएसआरसीपीच्या उमेदवारांना आणि नेत्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. TDP चे नेते आणि कार्यकर्त्यांनी खासदार मिथुन रेड्डी यांच्या ताफ्याचा रस्ता अडवला. तसेच वायएसआरसीपीच्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्याच्या केंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात वायएसआरसीपीच्या नेत्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचाही आरोप पक्षाने केला आहे.
घटनास्थळी पोलीस उपस्थित असतानाही त्यांनी हल्लेखोरांना रोखण्यासाठी किंवा उमेदवारांचं संरक्षण करण्यासाठी कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोप वायएसआरसीपीनं केला आहे. दरम्यान, तिरुपतीचे वायएसआरसीपी खासदार डॉ. एम. गुरुमूर्ती यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांना घाबरवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी सत्ताधारी टीडीपीचे कार्यकर्ते हिंसाचाराचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.