Bus Fire: महामार्गावर धावत्या बसला भीषण आग, ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू; थरारक VIDEO समोर

Uttar Pradesh Bus Fire: उत्तर प्रदेशच्या यमुनानगर एक्स्प्रेस वेवर धावत्या डबल डेकर प्रवासी बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून ९ जणांचा मृत्यू झाला.
Bus Fire: महामार्गावर धावत्या बसला भीषण आग, ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
Uttar Pradesh Bus FireSaam Tv News
Published On
  • यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला भीषण आग

  • ग्रेटर नोएडामध्ये बसला आग लागून ९ प्रवाशांचा मृत्यू

  • जेवरजवळ स्लीपर बसला आग लागल्याने मोठी वाहतूक कोंडी

  • शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची शक्यता

उत्तर प्रदेशमध्ये यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या बसमधून ४० ते ५० प्रवासी प्रवास करत होते. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी बसमधून उडी मारल्या. या बस अपघातामध्ये जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. यमुना एक्स्प्रेस वेवर जेवर परिसरातील दयानतपूर गावाजवळ हा अपघात झाला. बस ग्रेटर नोएडाहून आग्राकडे जात होती. अचानक बसमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि भीषण आग लागली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि अनेक प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

बसमधील अनेक प्रवाशांनी उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. या आगीत ९ प्रवाशांच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रेटर नोएडा येथील रस्ते अपघाताची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली.

Bus Fire: महामार्गावर धावत्या बसला भीषण आग, ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
Accident: रस्त्यावर CCTV लावत असताना भयंकर अपघात, भरधाव ट्रकने एचआर मॅनेजरसह ६ जणांना चिरडलं

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसला लागलेली आग इतकी भीषण होती की क्षणात संपूर्ण बस आगीचा गोळा बनली. आग वेगाने पसरल्याने काही प्रवासी बसमध्ये अडकले ज्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा आणि एका दिव्यांग मुलाचा समावेश आहे. जखमींना कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस दिल्लीहून महोबाकडे जात होती. ही बस राज कल्पना ट्रॅव्हल्सच्या मालकीची असल्याचे सांगितले जात आहे.

Bus Fire: महामार्गावर धावत्या बसला भीषण आग, ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com