cRIME sAAM
देश विदेश

Shocking Crime: "आज नको ना.."बेडवर बायकोने संबंध ठेवण्यास दिला नकार, नवऱ्याची सटकली थेट जीवच घेतला

Husband kills wife over intimacy refusal: पत्नीनं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे पतीनं चाकूने पत्नीची हत्या केली आहे. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे पतीने तिची निर्घुण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेनंतर परिसर हादरला आहे.

श्रीकाकुलमचे डीएसपी विद्या सागर म्हणाले की, आरोपी गली अप्पालारेड्डी आणि त्याची पत्नी नागम्मा हे संत सीतारामपुरम गावातील रहिवासी आहेत. दोघेही मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

मुलीचे लग्न झाले आहे आणि मुलगा नोकरीच्या शोधात विशाखापट्टणमला राहत आहे. आरोपी अजून फरार असून, पोलिसांनी फरार आरोपीला शोधण्यासाठी एक पथक तयार केले आहे.

त्या दिवशी नेमकं घडलं काय?

सोमवारी पती-पत्नी दोघेही नेहमीप्रमाणे कामावरून परतले. जेवणानंतर, अप्पालारेड्डीने आपल्या पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

परंतु, दिवसभराच्या कामामुळे थकलेल्या नागम्माने नकार दिला आणि झोपी गेली. आरोपीला बायकोने शारीरिक संबंध ठेवण्यास दिलेला नकार सहन झाला नाही. नवऱ्याला राग अनावर झाला. त्याने बायकोवर चाकूने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नागम्मा जागीच मरण पावला. पीडितेच्या शरीरावर १२ खोल जखमा आढळून आल्या. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT