Anand Mahindra  Saam Tv
देश विदेश

Delhi Pollution Update : दिल्लीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी सूचवला उपाय, VIDEO शेअर करत म्हटलं...

Anand Mahindra Post Over Delhi Pollution : दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर 10 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रविण वाकचौरे

Delhi Air Pollution :

दिल्लीतील प्रदूषित हवा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागत आहे. येत्या काळात या प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानेही देखील याबाबत सरकारला उपाययोजनांबात विचारणा केली आहे. आता देशातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी दिल्लीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाय सूचवला आहे.

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी म्हटलं की, दिल्लीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पेंढा जाळण्याचा पर्यायी उपाय आहे. त्यांनी पुनरुत्पादक शेतीचा वापर करण्याची विनंती केली. जेणेकरून दिल्लीतील प्रदूषणाचा सामना करता येईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"दिल्लीचे प्रदूषण दूर करण्यासाठी, शेतीचे पुनरुत्पादन करण्यासाठी एक संधी दिली पाहिजे. पेंढा जाळण्यापेक्षा हा एक फायदेशीर पर्याय असू शकतो आणि मातीची उत्पादकता देखील वाढवेल. @naandi_india चे @VikashAbraham मदतीसाठी तयार आहेत", असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं.  (Latest News)

दिल्लीत १० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद

दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर 10 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय राज्य सरकारने कार्यालयात जाणाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. ऑड इव्हन योजना लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी 13 ते 20 नोव्हेंबरपर्यंत ऑड-इव्हन योजना लागू असेल.

दिल्लीतील ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांना श्वसनाच्या समस्यादेखील जाणवत आहेत. खराब हवेमुळे नागरिकांना श्वास घेणेही मुश्कील बनले आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी बाळगण्याचं आवाहन देखील नागरिकांना प्रशासनाकडून केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT