मुंबई महानगर क्षेत्रात वाढणाऱ्या प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालायने 3 दिवसात प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करा असं सांगितलं आहे. त्यानंतर आजपासून ठाणे आणि नवी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर असून वाहतुकीबाबत काही बदल करण्यात आलेत.
दोन्ही महापालिकांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरच भरारी पथक नेमून मुंबईतली एकही डॅब्रिजची वाहने ठाणे आणि नवी मुंबई शहरात येण्यापासून रोखली जाणार आहेत. तसेच दोन्ही शहरात सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकाम ठिकाणी धूळ उडू नये यासाठी विकासकांनी उपाययोजना केल्यात की नाही याची या भरारी पथकाकडून पाहणी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती ठाणे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलीये.
मुंबईकरांच्या दैनंदिन व्यवहारांवर निर्बंध
मुंबतील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचल्याने आता थेट मुंबईकरांच्या दैनंदिन व्यवहारांवरच निर्बंध येण्याची स्थिती आली आहे. वाढत्या प्रदूषणात आरोग्य सांभाळण्यासाठी माॉर्निंग वॉक, संध्याकाळचे फिरणे, व्यायाम, धावणे टाळावे. तसेच सकाळ-संध्याकाळ घराची दारे- खिडक्या बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
प्रशासनाच्या या सूचनांना मुंबईत काही ठिकाणी चांगला प्रतिसाद देण्यात आलाय. तर काही ठिकाणी मुंबईकर मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं देखील चित्र आहे.
प्रदूषणावर मात करण्यासाठी BMC च्या गाइडलाइन्स
खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आरोग्य विभागाने नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉक, जॉगिंग आणि मोकळ्या हवेत व्यायाम करणे टाळा असे सांगितले आहे.
सकाळी आणि संध्याकाळी गरज नसल्यास उशिरापर्यंत खिडक्या खुल्या न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
लहान मुलं आणि गर्भवती महिलांनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचे आव्हान केलेय.
कपडा, रुमाल किंवा स्कार्फ हवेतील प्रदूषणापासून संरक्षण देत नाही. असे देखील सांगण्यात आले आहे.
श्वासोच्छवास, चक्कर येणे, खोकला, छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, डोळ्यांची जळजळ होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.