Air Pollution: वाढत्या प्रदुषणावर 'ही' पेय ठरतील फायदेशीर; रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास करतील मदत

Health News: वाढत्या प्रदुषणाचा परिणाम लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे.
Health News
Health NewsSaam TV
Published On

Air Pollution Drinks:

राज्यात सतत हवामान बदलताना दिसत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदुषण होताना दिसत आहे. याचा परिणाम लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे. त्यामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत.

वाढत्या प्रदुषणामुळे व्हायरल फ्लु, घसा खवखवणे, खोकला, आळस अशा अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना त्रास होत आहेत. यासाठी योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा पेयांची माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही आजारपणापासून दूर राहू शकतात.

अदरकचा चहा

अदरकचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा चहा पिल्याने शरीरास अनेक फायदे होतात. हा चहा बनवण्यासाठी पाणी उकळवा, त्यात एका चमचा हळददेखील घालू शकता. त्यानंतर हे पाणी चांगले उकळून घ्या. त्यानंतर गाळून पाणी प्या. हा चहा अँटिऑक्सिंडंटने परिपूर्ण आहे. यामुळे आजारपण दूर राहिल.

अॅलोवेरा ज्यूस

कोरफडमध्ये अनेक अँटी इम्फ्लेमेंटरी गुणधर्म आहेत. हा ज्यूस जळजळ कमी करण्यासाठी मदत करतो. हा रस करण्यासाठी एका ग्लासात एक चमचा कोरफडीचा आणि लिंबाचा रस मिसळा. प्रदुषणापासून होणाऱ्या त्रासासाठी हे पेय अतिशय फायदेशीर आहे.

गरम पाणी आणि लिंबू

शरीरातील डिटॉक्स पदार्थ बाहेर टाकण्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि लिंबू हे पेय पियू शकता. हे पेय बनवण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर कोमट झाल्यावर हे पाणी प्या. हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासदेखील मदत करते.

Health News
Yoga For Bad Breath : तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी हे आसन करा, झटक्यात होईल कमी

गाजराचा ज्यूस

गाजर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गाजरामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. हे गुणधर्म शरीरासाठी आवश्यक असतात. त्यामुळे रोज सकाळी गाजराचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले असते.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. यात तुम्ही लिंबाचा रस मिसळू शकता. ग्रीन टी प्यायल्याने तूमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. त्यातील गुणधर्म शरीरातील विषारी घटकांचा नाश करतात.

Health News
Dhanteras 2023 : धनत्रयोदशी कधी आहे? खरेदी करण्याचा उत्तम मुहूर्त कधी? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com